Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारट्रकचे ब्रेक फेल; मोठा अनर्थ टळला

ट्रकचे ब्रेक फेल; मोठा अनर्थ टळला

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

शहरातील स्टेट बँकेच्या समोर भरधाव वेगातील ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने रस्त्याच्या दुभाजकावर असलेल्या…(पहा अपघाताचे CCTV फुटेज)

- Advertisement -

लायन्स क्लबचे सुशोभिकरण जमिनदोस्त झाले आहे. यात जिवीतहानी झाली नसली तरी लायन्स क्लबचे नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज दि. 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास शहरातील स्टेट बँकेसमोर भरधाव वेगातील ट्रक जात होती.

मात्र, ट्रकचे ब्रेक फेल झाला. समोरे गर्दी असल्याने लोकांना वाचविण्यासाठी चालकाने ट्रक रस्त्याच्या दुभाजकाला धडक दिली. याठिकाणी लायन्स क्लबच्या सुशोभिकरण होते.

लायन्स क्लबतर्फे काही वर्षांपुर्वी दोन हातांवर पृथ्वी, त्यावर लायन्स क्लबचे चिन्ह असे सुशोभिकरण करण्यात आले होते.

मात्र, या अपघातात ते जमिनदोस्त झाले आहे. चालकाच्या प्रसंगावधानाने आज मोठा अनर्थ टळला. अन्यथा हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असतो.

याच ट्रकने चौपाळे रस्त्यावर असलेल्या के.आर.पब्लिक स्कुल जवळही अपघात केला.त्यामुळे पोलीस या ट्रकला पोलीस ठाण्यात जमा करण्यासाठी घेऊन जात होते. मात्र, मोठा मंदिरापसासून ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या