Monday, April 29, 2024
Homeनाशिकनांदगाव तहसीलच्या कौलांवर चढून आंदोलन; अनोख्या आंदोलनाची जिल्हाभरात चर्चा

नांदगाव तहसीलच्या कौलांवर चढून आंदोलन; अनोख्या आंदोलनाची जिल्हाभरात चर्चा

नांदगाव । प्रतिनिधी

नांदगाव तालुक्यात न्याय मिळवण्यासाठी आंदोलन केल्याशिवाय न्याय मिळत नाही असे म्हणत दर्शन शिंदे युवकाने सातबऱ्याला नाव लावण्यासाठी होत असलेल्या त्रासाला कंटाळून मंडळ अधिकाऱ्यांविरोधात चक्क तहसीलच्या कौलांवर चढून आंदोलन सुरू आहे…

- Advertisement -

सविस्तर वृत्त असे की, दर्शन कैलास शिंदे युवकाने सातबऱ्याला नाव लावण्यासाठी होत असलेल्या त्रासाला कंटाळून मंडळ अधिकाऱ्यांविरोधात चक्क तहसीलच्या कौलावर चढून आंदोलन सुरू केले आहे.

त्याच्या तक्रार अर्जात केवळ गट नं 313 या शेत जमिनीच्या उताऱ्यावर व इतर अधिकारात नाव लावण्याबाबत मंडळ अधिकारी त्रास देत असून वेळ काढू पणा करून माझे काम करत नसून त्यामुळे मी तहसील कार्यालय इमारतीवर चढून आंदोलन सुरू आहे असे बोलताना सांगितले.

मंडळ अधिकाऱ्यांने दखल न घेतल्याने म्हसुलचा अजब कारभार चव्हाट्यावर आला आहे. नांदगाव तालुक्यातील नागरिकांनी अनेक दिवसांपासून तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वार समोर सलग दोन दिवसापासून न्याय मिळवण्यासाठी आंदोलन सुरू आहेत.

प्रशासनावर अंकुश ठेवणारा कुणी वाली मिळेल का? प्रशासनाला निर्बंध कोण घालणार?अशा अनेक प्रश्ने अनुउत्तरीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या