Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्या'डीन'ला टॉयलेट साफ करायला लावणं पडलं महागात! खासदार हेमंत पाटलांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा

‘डीन’ला टॉयलेट साफ करायला लावणं पडलं महागात! खासदार हेमंत पाटलांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा

मुंबई | Mumbai

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Dr. Shankarao Chavan Government Medical College) व रुग्णालयामध्ये चोवीस तासात 24 रुग्णांचा मृत्यू (24 patients died) झाला होता. त्यानंतर नांदेडच्याच नाही तर राज्यातील शासकीय रुग्णालयातील प्रश्न ऐरणीवर आला. ठाणे, नांदेड आणि नंतर छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयामध्येही रुग्णांचा मृत्यू झाल्याने सर्वस्तरातून संताप व्यक्त करण्यात आला.

- Advertisement -

रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूनंतर शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील (MP Hemant Patil) यांनी रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी रुग्णालयातील अस्वच्छता पाहून संतापलेल्या हेमंत पाटील यांनी रुग्णालयाचे डीन डॉ. एस. आर. वाकोडे (Dean Dr. S. R. Wakode) यांनाच स्वच्छतागृह (Toilet) साफ करायला सांगितले. या प्रकारानंतर विरोधकांनी टीका करत थेट राजीनाम्याची मागणी केली होती. अखेर खासदार हेमंत पाटलांवर नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका वृत्तवाहिनीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या