Thursday, April 25, 2024
Homeजळगावअरेच्च्या ! टिईटी परिक्षेत नापास होण्यासाठीही गैरव्यवहार ....

अरेच्च्या ! टिईटी परिक्षेत नापास होण्यासाठीही गैरव्यवहार ….

भुसावळ bhusaval । प्रतिनिधी

सन 2019 च्या शिक्षक पात्रता परीक्षेत (Teacher Eligibility Test) गैरप्रकार (malpractice) केल्याचे प्रकरण गाजत (case is popular) असताना आता परिषदेने (Council) सन 2018 मधील टी.इ.टी. परीक्षेतही (T.E.T. exams) 1663 शिक्षकांची यादी जाहीर (List of teachers announced) केली असून त्यांना ही गैरव्यवहार प्रकरणी (case of malpractice) अपात्र घोषित (declared ineligible) केले आहे. पण गंमत अशी की, ज्या शिक्षकाने ही परीक्षा दिली, पण तो नापास (Failed) झाला त्याचेही नाव (His name too) सादर यादीत आहे! म्हणजे नापास (Even to fail) होण्यासाठीही गैरव्यवहार (malfeasance) करावा लागतो की काय? हे तर महान आश्चर्य आहे!

- Advertisement -

सन 2019 च्या शिक्षक पात्रता परीक्षेत गैरप्रकार केल्याच्या कारणावरून राज्यातील 7884 शिक्षकांना अपात्र घोषित करून त्यांची यादी नुकतीच जाहीर केली. त्या शिक्षकांचे ऑगस्ट 22 पासून पगारही रोखून ठेवले आहेत. उच्च न्यायालयाने मात्र शासनाची ही कृती बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.

ते प्रकरण गाजत असताना आता परिषदेने सन 2018 मधील टी.इ.टी. परीक्षेतही 1663 शिक्षकांची यादी जाहीर केली असून त्यांना ही गैव्यवहार प्रकरणी अपात्र घोषित केले आहे. पण गंमत अशी की, ज्या शिक्षकाने ही परीक्षा दिली, पण तो नापास झाला त्याचेही नाव सादर यादीत आहे! म्हणजे नापास होण्यासाठीही गैव्यवहार करावा लागतो की काय? हे तर महान आश्चर्य आहे!

जगात कोठेही नसलेला अजब गजब करून आम्ही काहीही करू शकतो हेच परीक्षा परिषदेने सिद्ध केले आहे! याचा दुसरा अर्थ, परीक्षा परिषदेचा कारभारच बोगस असून ती म्हणजे तेथील संबंधित अधिकारीही अपात्र आहेत, मग यांचेही वेतन थांबविणार का? त्यांचेवर अकार्यक्षम म्हणून त्यांचीही चौकशी करणार का?

वेळोवेळी शिक्षकांवर कारवाईचा बडगा उचलणार्‍या परिषदेचा चमत्कारिक कारभार पाहून घोषित यादी कितपत यथार्थ मानावी अशीही शंका निर्माण होत आहे. परीक्षेत गैव्यवहार करणार्‍या शिक्षकांची जशी यादी जाहीर केली तशी ह्यातील एजंट कोण आहेत?

कोणाच्या माध्यमातून हा गैव्यवहार झालाय त्यांची यादी का नाही जाहीर करत त्यांना रान मोकळे कसे? असा प्रश्न शिक्षकांचे ज्येष्ठ नेते तथा शिक्षणतज्ज्ञ प्र. ह. दलाल यांनी एका पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या