Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकनमामि गोदा प्रकल्प : मनपाकडून सल्लागाराची नेमणूक

नमामि गोदा प्रकल्प : मनपाकडून सल्लागाराची नेमणूक

नाशिक । प्रतिनिधी Nashik

भाजपचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या तसेच केंद्र सरकारने 1,823 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेल्या महत्वाकांशी ‘नमामि गोदा प्रकल्प’चा ( Namami Goda Project)संपूर्ण आराखडा अर्थात डीपीआर येत्या तीन महिन्यांत तयार होण्याची आशा निर्माण झाली आहे. नाशिक महापालिकेने याबाबत सल्लागाराची नेमणूक केली असून तो येत्या तीन महिन्यांत आपला अहवाल महापालिकेला सादर करणार असल्याचे समजते.

- Advertisement -

‘नमामि गोदा’ प्रकल्पाच्या सल्लागार नेमणूक प्रक्रिया मागील सुमारे एक वर्षापासून सुरू होती. यासाठी एकूण सात संस्थांनी अर्ज केले होते. त्यांची छाननीची प्रक्रिया होऊन सात पैकी दोन अर्ज बाद झाले होते तर पाच संस्थांशी महापालिकेची बोलणी सुरू होती, सर्वात कमी बोली लावणार्या कंपनीला सल्लागार म्हणून नेमणूक केल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सतीश कुलकर्णी महापौर असताना त्यांनी दक्षिणेतील गंगा म्हणून प्रसिद्ध नमामि गंगेच्या धर्तीवर नमामि गोदा प्रकल्प तयार करून त्यासाठी थेट केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता, तसेच 1823 कोटी रुपयांची तत्वता मंजुरी आणली होती. महापौर पदाच्या शेवटच्या दिवशी या कामाचे भूमिपूजन देखील केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते झालेले आहे.

सल्लागार नेमणुकीसाठी कासगवती होत असल्याचे दिसून येत होते. परंतु आता सल्लागाराची नेमणूक झाल्याने कामाला गती मिळणार आहे. सल्लागार कंपनी गुजरातमधील साबरमती, उत्तर प्रदेशातील वाराणसी आणि प्रयागराज येथील नदींवर झालेल्या कामांची पाहणी करणार आहे. यात पालिकेचे शहर अभियंतासह यांत्रिकी विभागाचे अधिकारी असणार आहे. महत्वकांक्षी आणि शहराच्या धार्मिक दुष्टीकोणातून महत्वाचा असलेला हा प्रकल्प नाशिककरांसाठी महत्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पाद्वारे शहरातील गोदावरी मध्ये येणारे नाल्यांचे सांडपाणी थेट नदीत येउ न देता शहराबाहेर काढले जाणार आहे.

यामुळे नदी प्रदुषण रोखता येणार असून गोदावरीचे पाणी शुद्ध होणार आहे. या दुष्टीने नमामी गोदा प्रकल्प महत्वाचा आहे. सध्याच्या स्थितीत गोदावरी नदीत ठिकठिकाणी सांडपाणी येऊन मिसळतेे. यामुळे नदी मोठया प्रमाणात दुषीत होते. परंतु ‘नमामी गोदा’ प्रकल्पामुळे नदीचे प्रदूषण टाळ्ता येणार आहे. दरम्यान सल्लागाराला सहा महिन्यांची मुदत देण्यात आली असली तरी येत्या तीन महिन्यांतच अहवाल येण्याची शक्यता आहे.

नाशिक शहराला लाभलेले ऐतिहासिक तसेच धार्मिक महत्त्व अबाधित ठेवून नाशिकचा विकास करण्यात येणार आहे. नमामी गोदा प्रकल्प राबवताना बारीक-सारीक गोष्टींचा विचार करण्यात येईल.

डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मनपा आयुक्त तथा प्रशासक

- Advertisment -

ताज्या बातम्या