Wednesday, April 24, 2024
Homeजळगाव‘नही’ रस्ते महामार्गावर ‘एसओएस’ ची सुविधा

‘नही’ रस्ते महामार्गावर ‘एसओएस’ ची सुविधा

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

जिल्हयात केन्द्र शासनाच्या माध्यमातून महामार्गांचे विस्तारीकरण केले जात आहे. या रस्ते महामार्गांवर आपत्कालीन प्रसंगी मदत उपलब्ध व्हावी यासाठी किमान दोन ते पाच कि.मी. अंतरावर ठिकठिकाणी वायरलेस रेडीओग्राफ यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली असल्याची माहिती ‘नही’ च्या सुत्रांनी दिली.

- Advertisement -

जिल्हयात पूर्वीचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा तरसोद ते फागणे, जळगाव औरंगाबाद आणि जळगाव पाचोरा दरम्यान असलेला राज्य मार्ग क्रमांक 158 ‘नही’कडे एनएच जे 753 क्रमांकानुसार हस्तांतरीत झालेला जळगाव मनमाड महामार्गाचे विस्तारीकरण, कॉक्रीटीकरण साइडपट्ट्यांचे भराव आदी कामे पुर्णत्वास येत आहेत. या विस्तारीकरणामुळे रस्त्यांवरील दळणवळण सुविधा उपलब्ध होणार आहे. महामार्गावर ट्रामा केअर सेंटर, प्रथमोपचार, वा अन्य सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध केल्या जात आहेत.

या महामार्गांवर गावे असली तरी बर्‍याच ठिकाणी जंगल वा मोकळया माळरानातून जाणार्‍या परीसरात अपघात घडल्यास आपत्कालीन प्रसंगी विशेषतः मोबाईल वा लॅडलाईन फोन सर्वच ठिकाणी उपलब्ध नसतात. याची शक्यता लक्षात घेता नॅशनल हायवे अ‍ॅथारिटी विभागातर्फे वायरलेस रेडीओग्राफ यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली आहे. या सुविधेव्दारा अपघातग्रस्तांसाठी अ‍ॅम्बुलन्स, अपघातस्थळी वाहतुकीत अडथळा येउ नये म्हणून अडकलेली वाहने बाजूस करण्यासाठी क्रेन, अग्नीशमन यंत्रणा मदतीसाठी पाठविण्याचे संकेत मिळणार असल्याची सुविधा उपलब्ध होणार आहेत.

जळगाव मनमाड महामार्गावर अपघात वा आपत्कालीन प्रसंगी 100, 108 क्रमांक डायल केल्यास अपघात स्थळी सर्वप्रथम अ‍ॅम्ब्युलन्स, पोलिस आदी पथक जलद गतीने मदत पोचवू शकते. त्याच प्रमाणे या दोनही सुविधा कार्यरत नसतील अशा वेळी नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी अंतर्गत असलेल्या महामार्गावर दर दोन ते पाच कि.मी अंतरावर पिवळया रंगाचे खांबावर सोलर बॅटरीयुक्त एसओएस चिन्हांकित वायरलेस रेडीओग्राफ यंत्रणा बसविण्यात आली आहे. पिवळया रंगाच्या पोलवर असलेल्या एसओएस या सुविधेव्दारा तात्काळ अपघातग्रस्तांसाठी मदत पोचविणे शक्य होणार आहे.

विकास महाले, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय रस्ते विकास धुळे विभाग

- Advertisment -

ताज्या बातम्या