Wednesday, April 24, 2024
Homeधुळेउपमहापौर पदासाठी नागसेन बोरसेंनी पुकारले बंड

उपमहापौर पदासाठी नागसेन बोरसेंनी पुकारले बंड

धुळे Dhule । प्रतिनिधी

महापालिकेच्या (Municipal Corporation) उपमहापौरपदासाठी (Deputy Mayor) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी अतिशय नाट्यमय घडामोडी घडल्या. सत्ताधारी भाजपतर्फे (Bjp) प्रभाग क्र. 2 चे नगरसेवक अनिल नागमोते यांना संधी देऊन त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. तर नेत्यांनी शब्द देवूनही संधी न दिल्याने प्रभाग क्र.4 चे नगरसेवक नागसेन बोरसे (Corporator Nagsen Borse) यांनी भाजपवर टिकास्त्र सोडले. त्यांनीही आपला उमेदवारी अर्ज (Candidature application) दाखल केला. महापालिकेतील भ्रष्टाचार (Corruption) वेळोवेळी बाहेर काढत असल्यामुळे आपल्याला संधी नाकारण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. संधी न दिल्यास आत्महत्या करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

- Advertisement -

उपमहापौर भगवान गवळी (Deputy Mayor Bhagwan Gawli) यांनी पदाचा राजीनामा (Resigned) दिल्याने या रिक्त जागेसाठी अर्ज दाखल करण्याची आज दुपारी दोन वाजेपर्यंत शेवटची मुदत होती. त्यानुसार सत्ताधारी भाजपतर्फे नगरसेवक अनिल नागमोते (Corporator Anil Nagmote) यांना संधी देण्यात आली. त्यांनी आपला अर्जही दाखल केला. यावेळी खा. डॉ. सुभाष भामरे, माजी आ. राजवर्धन कदमबांडे, महापौर प्रदीप कर्पे, माजी स्थायी समिती सभापती संजय जाधव, हर्षकुमार रेलन, हिरामण गवळी आदी उपस्थित होते. दरम्यान आपल्याला शब्द देवून संधी न दिल्यामुळे नागसेन बोरसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजपविरुद्ध बंड पुकारत पक्षादेश झुगारून त्यांनी एकट्यानेच नगरसचिव मनोज वाघ (Municipal Secretary Manoj Wagh) यांच्या दालनात जाऊन आपला उमेदवारी अर्जही दाखल केला.

भाजपावर टिकास्त्र-

नागसेन बोरसे यांनी उमेदवारी अर्ज(Candidature application) दाखल केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मी गेल्या साडेतीन वर्षापासून भारतीय जनता पक्षात प्रामाणिकपणे काम करत आहे. पक्षाने दिलेले आदेश मी वेळोवेळी पाळले. शिवाय तन-मन-धनाने पक्षाचे काम केले. परंतु, पक्षाने आता मला आदेश दिला, की तुम्हाला उपमहापौर पदासाठी अर्ज भरता येणार नाही.

मात्र, पक्षादेश झुगारून मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. साडेतीन वर्षात पक्षाने मला उमेदवारी (Candidacy) का नाकारली, याचा सोक्षमोक्ष करणार आहे. मी या महाराष्ट्राातील जनतेला आवाहन करतो की, भारतीय जनता पक्षामध्ये कुणीही काम करू नका. मी अजूनही पक्षाच्या आदेशाची (order) वाट पाहीन.

त्यानंतरही माझी उमेदवारी नाकारल्यास मी लाइव्ह आत्महत्या (Suicide) करणार आहे. उपमहापौरपदी संधी देण्याबाबत स्थानिक पातळीवरील पक्षाचे नेते खा.डॉ. सुभाष भामरे (Dr. Subhash Bhamre,), माजी आ. राजवर्धन कदमबांडे, महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी आपल्याला शब्द दिला होता. परंतु, ते आता म्हणताहेत, की वरिष्ठ पातळीवरून हा आदेश आला आहे. परंतु, केवळ माझी जात पाहून मला उमेदवारीची संधी दिलेली नाही. पक्षातील माझ्या कामाची दखल घेतली गेली नाही. माझ्या बुद्धिमत्तेचीही कदर पक्षाने केली नाही. मी वेळोवेळी भ्रष्टाचार(Corruption) उघड करतो म्हणून मला उमेदवारी नाकारली, असा माझा स्पष्ट आरोप आहे.

महापालिकेचा सुमारे 50 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प (Budget) हा तुटीचा असतांना पाच कोटी शिलकीचा सादर केला. त्यास मी विरोध केल्यामुळे मला उमेदवारी नाकारली आहे. यांचा भ्रष्टाचार (Corruption) मी कदापि खपवून घेणार नाही, यांचे सर्व काळे धंदे बाहेर काढीन, यांनी महापालिकेत केलेला भ्रष्टाचार जनतेच्या समोर आणले,असा इशाराही नागसेन बोरसे यांनी माध्यमांशी बोलतांना देवून टाकला.

- Advertisment -

ताज्या बातम्या