Sunday, April 28, 2024
Homeनगरसमृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण

समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण

नाशिक | Nashik

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा (Samruddhi Mahamarg Second Phase) शिर्डी-भरवीर अखेर आजपासून खुला झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिर्डीमध्ये समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आले.

- Advertisement -

महामार्गाचा दुसरा टप्पा सुरू झाल्याने आता नागपूर ते भरवीर (नाशिक) (Bharvir) हे अंतर आता सहा तासांत पूर्ण करता येणार आहे. शिर्डी (Shirdi) येथे आज समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन पार पडले.

शिर्डी ते इगतपुरी (Shirdi-Igatpuri) हा ८० किलोमीटरचा हा टप्पा आहे. याचा फायदा मुंबई (Mumbai) आणि आसपासच्या शहरातून शिर्डीला जाणाऱ्या प्रवाशांना या महामार्गाचा लाभ होणार आहे. शिवाय शेतकऱ्यांनाही याचा फायदा होईल. नागपूरहून इगतपुरीपर्यंत आता नॉनस्टॉप प्रवास करता येणार आहे.

याआधी डिसेंबर २०२२ मध्ये नागूपर ते शिर्डी अशा पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात असून हा पहिला टप्पा ५०१ किमीचा आहे. आता, शिर्डी ते भरवीर हा ८० किमीचा टप्पा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आता शिर्डी ते भरवीर हे अंतर अवघ्या ४० ते ४५ मिनिटात पार करता येणार आहे.

समृध्दीचा दुसरा टप्पा कसा असणार

७०१ किमी पैकी ६०० किमीचा रस्ता प्रवासासाठी खुला झाला असून या महामार्गावरील वाहतूक आजपासून सुरू झाली आहे. या महामार्गावर ७ मोठे पूल, १८ छोटे पूल असतील, वाहनांसाठी ३० भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी २३ भुयारी मार्ग, ३ पथकर प्लाझावरील तीन इंटरचेंज, ५६ टोल बूथ, ६ वे ब्रिज आदी सुविधांचा समावेश असणार आहे. पॅकेज क्र ११,१२ आणि १३ चे इगतपुरी तालुक्यामधील भरवीर पर्यंतचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्याचा खर्च ३२०० कोटी रुपये एवढा असून लांबी ८० कि मी आहे.

“संजय राऊत म्हणजे राजकारणातील…”; शिवसेना नेत्याची टीका

या दुसऱ्या टप्यात सिन्नर येथील गोंदे इंटरचेंज येथून नाशिक, अहमदनगर, पुणे व त्या भागातील इतर गावांसाठी या महामार्गाचा उपयोग होईल. भरवीर इंटरचेजपासून घोटी (ता. इगतपुरी) हे अंदाजे 17 कि.मी अंतरावर आहे. या इंटरचेंजपासून नाशिक, ठाणे, मुंबई येथून शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांचा प्रवास जलद होईल. याशिवाय शिर्डी, अहमदनगर व सिन्नर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मुंबई महानगर प्रदेशात येण्यासाठी कमी कालावधी लागेल.

राहुल गांधींना दिल्ली न्यायालयाकडून मोठा दिलासा

तिसरा टप्पा कधी सुरु होणार

शिर्डी ते भिवंडी या टप्प्याचं काम अजूनही सुरू असून सिन्नर ते कसारा टप्प्यात 12 बोगदे आणि 16 छोटे पूल उभारावे लागणार आहेत. इगतपुरी ते भिवंडीजवळील आमने गाव हा शेवटचा टप्पा डिसेंबर अखेरीस खुला होण्याची शक्यता आहे. इगतपुरी ते भिवंडीजवळील आमने गाव हा शेवटचा टप्पा डिसेंबर अखेरीस खुला केला जाणार असल्याची माहिती आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

- Advertisment -

ताज्या बातम्या