Friday, April 26, 2024
HomeUncategorizedPhoto नागपंचमी विशेष : कोणते साप आहेत विषारी अन्‌ बिनविषारी

Photo नागपंचमी विशेष : कोणते साप आहेत विषारी अन्‌ बिनविषारी

राजेंद्र पाटील

जळगाव । Jalgaon

- Advertisement -

आज नागपंचमी असल्याने सर्पांविषयी असलेला समज, गैरसमज याबद्दलच्या माहितीसह विषारी व बिनविषारी सापांच्या विविध जाती सचित्र स्वरूपात बघुया…

प्रत्येक जिल्ह्यात सर्पमित्र गृप हा असतोच आणि ते सपर्वांविषयी नेहमी जनजागृती करत असतात, त्याचप्रमाणे कोणत्याही ठिकाणी साप दिसला तर त्यास विजा न पोहचवता तत्काळ सर्पमित्राशी संपर्क साधण्याचे आवाहन करत असतात.

साप हा शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो. आपण नागपंचमीच्या दिवशी सर्पाचे पूजनही करतो मात्र इतर दिवशी अचानक कोठे साप दिसला तर त्यास अनेकजण मारून टाकतात.

प्रत्येक साप हा विषारी नसतो तर खुप कमी संख्येने विषारी जातीचे साप दृष्टीस पडतात. तो विषारी कि बिनविषारी याची माहिती आपल्याला नसते.

सर्प मित्र सापांना पकडून निसर्गाच्या सान्निध्यात सोडून देतात, तसेच वन्यजीव व सर्प जखमी झालेले असतील तर त्यांना पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून उपचार व देखरेख करून निसर्गाच्या सान्निध्यात सोडून देतात.

सर्पदंश व प्रतिबंध : शेतकरी, मंजूरांनी पूर्ण कपडे व गम बूट घालावेत, गवत कापताना अगोदर गवतातून काठी फिरवावी.

रात्रीच्यावेळी बॅटरी व काठीचा वापर करावा. भिंतीस चिटकून बिछाना टाकू नये, शक्यतो खाट व मच्छरदाणीचा वापर करावा.

उंदरांवर नियंत्रण ठेवावे. घराभोवती असलेल्या झाडांच्या फांद्या घर खिडक्यांना स्पर्श करणार्‍या नसाव्यात. घराजवळ पाण्याचे डबके, उकीरडा असू नये. घरातील अडगळीच्या जागा काळजीपूर्वक वापराव्यात.

साप चावल्यास प्रथमोपचार : रूग्णास मोकळ्या जागेत घेणे, रूग्णास घाबरू न देता धीर द्या, रूग्णास पळू देऊ नका, हालचाल करू देऊ नका. दंश झालेला भाग हृदयाच्या पातळीच्या खाली असावा.

हाताला दंश असल्यास दंडाला व पायाला दंश असल्यास मांडीला आवळपट्टी बांधावी. रूग्णास त्वरीत जवळच्या रूग्णालयात दाखल करा.

- Advertisment -

ताज्या बातम्या