नागेश्वर मंदिराची दानपेटी फोडून रोकड लंपास

jalgaon-digital
1 Min Read

देवळाली प्रवरा |वार्ताहार|Deolali Pravara

राहुरी फॅक्टरी येथील डॉ. तनपरे कारखाना कार्यस्थळावरील नागेश्वर मंदिराची दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडून यातील रोकड व वस्तू लंपास केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

डॉ.तनपुरे कारखान्याच्या प्रवेशद्वारापासून हाकेच्या अंतरावर नागेश्वर मंदिर आहे. या मंदिराच्या फाटकाचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून आतमध्ये प्रवेश करून मंदिरातील दानपेटी फोडून यातील रोकड व इतर वस्तू लंपास केल्या. सकाळी दैनंदिन पूजा करण्यासाठी पुजारी सुनिल काळे व दहीभाते गेले असता त्यांना चोरीचा प्रकार निदर्शनास आला. सध्या तनपुरे कारखाना जिल्हा बँकेच्या ताब्यात असून या ठिकाणी सुरक्षा रक्षक कार्यरत आहे.

सुरक्षा रक्षक पहार्‍यावर असताना अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या मंदिरात दानपेट्या फोडण्यात आल्याने जिल्हा बँकेमार्फत असलेली खासगी सुरक्षा यंत्रणा पुन्हा एकदा कमकुवत असल्याचे उघड झाले आहे. डॉ. तनपुरे कारखाना परीसरात वारंवार चोरीच्या घटना घडत असल्याने कारखाना कार्यस्थळावर असलेली जिल्हा बँकेची खासगी सुरक्षा यंत्रणा ‘असून अडचण, नसून खोळंबा’ या प्रमाणे झाली आहे. जिल्हा बँकेची खासगी सुरक्षा यंत्रणा कारखाना परिसरातील चोरीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यावर अयशस्वी ठरल्याने तनपुरे कारखाना कामगार वर्गातील सुरक्षारक्षकांना सेवेत घ्यावे, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *