Thursday, April 25, 2024
Homeजळगावविषय समितीच्या सदस्य पदाच्या निर्णयावरुन न.पा.ची.सभा स्थगित

विषय समितीच्या सदस्य पदाच्या निर्णयावरुन न.पा.ची.सभा स्थगित

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

चाळीसगाव नगर परिषदेची बुधवारी(दि,२०) आयोजित सर्वसधारण सभा शिवसेनेच्या नगरसेविका विषय समितीच्या सदस्य पदाच्या निर्णया सदर्भात न्यायालयात गेल्यामुळे, जिल्हाधिकार्‍यांनी स्थगित केली. आता पुढील सभा जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने होणार आहे.

- Advertisement -

चाळीसगाव नगरपरिषदेची मागील विशेष सर्वसाधरण सभा दि,५ रोजी संपन्न झाली. या सभेत विशेष समितीमध्ये सभागृहातील सदस्यांच्या संख्याबळाचे प्रमाण निश्‍चित करण्यात आले. यात न.पा.च्या विविध विषय समित्या निवडीसाठी शहवि आघाडीच्या १० सदस्या संख्या निवडीच्या बाजून १८ सदस्यांनी कौल दिला, तर भाजपाच्या ११ सदस्य संख्या निवडीच्या बाजून फक्त १४ सदस्यांनी कौल दिला होता.

त्यानुसार १० सदस्य संख्या निश्‍चित झाली होती. त्यात आता समिती सदस्यात शहर विकास आघाडीचे एका समितीत ५ तर भाजपाचे ४ सदस्य राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. या व्यतिरीक्त शिवसेनेचे चाळीसगांव नगरपालीकेत एकूण २ सदस्य आहेत, या दोघांनी समिती सदस्य पदासाठी अर्ज दाखल केल्याने त्यापैकी एकाची वर्णी लागणार होती, त्यासाठी शिवसेनेच्या नगरसेविका विजया पवार यांच्या सदस्य निवडीसाठीबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव पाठविला होता.

त्या प्रस्तावावर जिल्हाधिकार्‍यांनी निर्णय देणे प्राप्त होते. परंतू निर्णय प्रलंबित असतानाच सभापती निवडीसाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. याविरोधात शिवसेनेच्या नगरसेविका विजया पवार यांनी औरंगाबाद खंडपिठात धाव घेवून याचिका दाखल केल्याने, दि,२० रोजी होऊ घातलेली सभा जिल्हाधिकार्‍यांनी पुढील आदेश होईपर्यंत रद्द केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या