Thursday, April 25, 2024
Homeनगरउपोषणाचा इशारा देताच पारनेर नगरपंचायत प्रशासनाला आली जाग

उपोषणाचा इशारा देताच पारनेर नगरपंचायत प्रशासनाला आली जाग

पारनेर |तालुका प्रतिनिधी|Parner

पारनेर शहरामध्ये चौरे, आंबे वस्तीवर जलवाहिनी मंजूर असताना कार्यवाही न झाल्यामुळे

- Advertisement -

नगरपंचायतला वेळोवेळी याबाबत विचारणा केली मात्र त्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले म्हणून श्रीकांत चौरे व समीर आंबे यांनी उपोषण करण्याचा इशारा नगरपंचायतचा दिला. त्यावर मुख्याधिकारी यांनी जुन्या लाईनची तत्काळ दुरुस्ती करून लवकरच नवीन प्रलंबित काम सुरू करू, असे लेखी पत्र श्रीकांत चौरे यांना दिले आहे. त्यामुळे उपोषणाचा इशारा देताच प्रशासनाला जाग आल्याचे नागरिकांत बोलले जात आहे.

शहरांमधील चौरे-आंबे वस्तीवर जलवाहिनी मंजूर असताना कार्यवाही न झाल्याबद्दल श्रीकांत चौरे व समीर आंबे यांनी गेले अनेक महिने लेखी व तोंडी स्वरूपात नगरपंचायत प्रशासनाला विनंती केली होती व त्या संदर्भात प्रभाग क्रमांक 9 मधील पाण्यापासून वंचित असणार्‍या नागरिकांचे सह्यांचे निवेदनही सुपूर्द केले होते.

परंतु त्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले होते. सदर आंबे, चौरे व गायकवाड वस्तीला गेले अनेक वर्षे पाण्याचा एक थेंबही मिळाला नाही तरीही नगरपंचायत प्रशासन या वस्तीवर पाणीपट्टी वसुलीसाठी येत आहेत. त्या संदर्भात वारंवार विचारणा करूनही दुर्लक्ष करण्यात आले. नगरपंचायत कर वसुली करते तर नागरीसुविधा देणे क्रमप्राप्त व पाईपलाईन मंजूर असताना जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे श्रीकांत चौरे, समीर आंबे यांनी वंचित प्रभाग क्रमांक 9 चे अमित जाधव, किरण सोनवणे, सुधीर सोनवणे, विनायक सोनवणे, जीवन घंगाळे, योगेश कांबळे, साईनाथ धोत्रे यांच्यासह शहरातील नागरिकांनी आमरण उपोषण करण्याचे लेखी निवेदन नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सौ. सुनीता कुमावत यांना देण्यात आले होते.

उपोषणाच्या इशार्‍यानंतर मुख्याधिकारी यांनी लेखी निवेदनात असे नमूद केले की, नगरपंचायत सर्वसाधारण सभेने दि. 19 ऑगस्ट रोजी ठराव केला व 8 दिवसांत दलित वस्ती निधीतून सदर कामास मंजुरी देण्यात आलेली आहे. सहाय्यक संचालक नगररचना यांना प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता.

परंतु जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर यांचे पत्र दि. 19 ऑक्टोबरनुसार सदर निधी खर्च करण्याची मुदत 31 मार्च रोजी संपली असल्याने पुढील सर्वसाधारण सभेमध्ये 14 वा वित्त आयोग अबंधनकारक निधीतून घेण्यासाठी विषय समाविष्ट करण्यात येईल.

त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. तसेच तोपर्यंत सध्या अस्तित्वात असलेली पाईपलाईनची दुरुस्ती करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात येईल तरी आपण या उपोषणापासून परावृत्त व्हावे, अशी विनंती अर्जदार श्रीकांत चौरे, समीर आंबे व प्रभाग क्रमांक 9 मधील नागरिकांना केली व त्या आशयाचे लेखी पत्र श्रीकांत चौरे व नागरिकांकडे सुपूर्द करण्यात आले. जाहीर केलेले उपोषण मागे घेण्याबाबत विनंती केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या