Thursday, April 25, 2024
Homeनगरसंगमनेर शहर सोलर सिटी होणार - नगराध्यक्षा सौ. तांबे

संगमनेर शहर सोलर सिटी होणार – नगराध्यक्षा सौ. तांबे

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

जिल्ह्यात आर्थिकदृष्ट्या संपन्न व प्रगतशील असणार्‍या संगमनेर शहरात ना. बाळासाहेब थोरात व आ. डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली

- Advertisement -

नगरपालिकेच्यावतीने मोकळ्या जागेत सौर पॅनल बसविण्यात येणार असून घरगुती सौर पॅनल वापरासाठी नागरिकांना प्रोत्साहित करून संपूर्ण शहर सोलर सिटी बनविण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांनी दिली.

सौ. तांबे म्हणाल्या, संगमनेरमध्ये ग्रीनसिटी, क्लीन सिटी अंतर्गत सातत्याने विविध उपक्रम राबविले जात आहे. यामध्ये नागरिकांचा मोठा सहभाग आहे. आर्थिकदृष्ट्या संपन्न बाजारपेठ, प्रगतशील शहर म्हणून संगमनेरचा राज्यात लौकिक निर्माण झाला आहे. नगरपरिषदेने अपारंपरिक उर्जेला प्रोत्साहन देत व नागरिकांचे वीजबिल वाचविण्यासाठी सौर ऊर्जा पॅनल माध्यमातून उर्जा निर्मिती करण्याचं काम हाती घेतले आहे. या अंतर्गत नगरपालिकेच्या ताब्यात असणार्‍या मोकळ्या जागेवर सौर पॅनल उभारण्यात येणार असून त्या ठिकाणाहून सौरदिवे लावण्यात येणार आहेत.

शहरातील सर्व नागरिकांना आवाहन आहे, त्यांनी आपल्या घरावर कमी खर्चामध्ये सौर पॅनल उभा करून सौर उर्जेची निर्मिती करावी. यामुळे मोठी उर्जा बचत होणार आहे. तसेच प्रदूषण विरहित अपारंपरिक उर्जेला प्रोत्साहन मिळणार आहे. भारतात मुबलक सूर्यप्रकाश असून याचा घरगुती उर्जा निर्मितीसाठी वापर केला जाणार आहे.

ही अभिनव संकल्पना शहरात राबविण्यात येणार असून यासाठी नागरिकांना प्रोत्साहन व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या सौर पॅनलसाठी घरगुती ग्राहकांना साधारण 25 हजार रुपये खर्च येणार असून यासाठी मर्चंट बँक नागरिकांना अर्थसहाय्य करणार आहे.

या माध्यमातून त्यांची कायमची उर्जा समस्या सुटणार आहे. या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन उपनगराध्यक्षा सुमित्राताई दिड्डी, सर्व नगरसेवक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सचिन बांगर यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या