Friday, April 26, 2024
Homeनगरअधिकृत कत्तलखान्याचा वापर करा अन्यथा कठोर कारवाई - नगराध्यक्ष वहाडणे

अधिकृत कत्तलखान्याचा वापर करा अन्यथा कठोर कारवाई – नगराध्यक्ष वहाडणे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

रात्री अपरात्री गोवंश कत्तल करून नगरपरिषदेच्या व शासनाच्या डोळ्यात धुळ फेकण्याचे काम सुरू आहे. संबंधितांना अनेकदा सांगूनही मनाई येथील अधिकृत कत्तलखान्याचा वापर होत नाही, दुकानांचे भाडेही थकविलेले आहे.

- Advertisement -

गोवंश हत्त्या करून शहरवासीयांच्या भावनांशी खेळण्याचे काम सुरू आहे. रात्री अपरात्री बेकायदा कत्तल करून रक्त-मांस नाल्यात व नाल्यातून नदीत सोडल्याने सर्वांचेच आरोग्य धोक्यात आलेले आहे. संबंधित कसायांनी गोवंश हत्त्या बंद करून मनाई येथील कत्तल खान्याचा वापर करावा, थकित जागा भाडे त्वरित भरावे. आरोग्य विभाग व मार्केट विभागाने दिलेल्या नोटिसा-सुचना पाळा अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा नगराध्यक्ष वहाडणे यांनी दिला आहे.

नगराध्यक्ष वहाडणे म्हणाले, संजयनगर येथील बेकायदा कत्तलखाना शहराच्या आरोग्यासाठी हानिकारक होता. म्हणून औद्योगिक वसाहती जवळील मनाई येथे सोयीसुविधा युक्त कत्तलखाना स्लॉटर हाऊस सुरू करून म्हैसवर्गीय जनावरे कत्तल करण्याची सोय करून दिलेली असतांनाही संजयनगर येथे बेकायदेशीरपणे गोवंश हत्त्या होत आहे.

नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांनी सांगूनही असे प्रकार सुरू आहेत. याच कसाई वर्गाला विक्रीसाठी जागाही उपलब्ध करून दिली. अनेकांनी त्याचे भाडेही थकवलेले आहे. नागरिक, नगरपरिषद व शासनाचा अंत पाहू नका. सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आणण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. याआधी सहकार्य करूनही तुम्ही असेच बेकायदा कृत्य करणार असाल तर ते कुणालाही परवडणारे नाही.

नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत बोंबा मारून गोंधळ घालणार्‍या नगरसेवकांमध्ये हिंमत असेल, शहरातील नागरिकांची-आरोग्याची-स्वच्छ तेची काळजी असेल तर त्यांनी या विषयावरही तोंड उघडावे. सर्वकाही प्रशासनावर ढकलून देण्यापेक्षा सर्वांनीच या विषयावर आवाज उठविणे, सहकार्य करणे आवश्यक आहे. प्रशासनाला स्थानिक लोकप्रतिनिधीनी सहकार्य करणे सर्वांच्याच हिताचे होईल असेही वहाडणे यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या