Thursday, April 25, 2024
Homeनगरप्रत्येकाच्या मनात शिवरायांचे स्थान - नगराध्यक्षा आदिक

प्रत्येकाच्या मनात शिवरायांचे स्थान – नगराध्यक्षा आदिक

श्रीरामपूर |वार्ताहर| Shrirampur

प्रत्येकाच्या मनात शिवरायांचे स्थान आहे. त्यांना वंदन करण्यासाठी शिवजयंतीची गरज नाही.

- Advertisement -

प्रत्येक चांगल्या कामात शिवरायांचे स्मरण नकळत होत राहते, असे प्रतिपादन नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केलेे.

नगरपालिकेच्यावतीने आज तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादम करण्यात आले. यावेळी त्यांच्या प्रतिमेस हार घालून नगरध्यक्षा अनुराधा आदिक यांनी अभिवादन केले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मुख्याधिकारी गणेश शिंदे, नगरसेवक राजेद्र पवार, प्रकाश ढोकणे, अलतमश पटेल, कलीम कुरेशी, भाऊसाहेब डोळस, रज्जाक पठाण, अर्चना पानसरे, ग्रंथपाल स्वाती पुरे, पानसरे आदि उपस्थित होते.

नगराध्यक्षा अनुराधा आदिक म्हणाल्या, करोनाशी आपली लढाई सुरू आहे. छत्रपतींनी ज्या लढाया केल्या त्यात त्यांनी शत्रूला पराभूत केले. त्यांच्या ढाल तलवारी आज नसल्या तरी कोरोना या शत्रूशी लढाई करताना मास्क हीच आपली ढाल आहे, हे विसरू नका. महाराजांना मोठी दूरदृष्टी होती. स्वराज्यासाठी काय काय केले जाऊ शकते, याचा विचार त्यांच्याकडे होता. स्वराज्य स्थापनेनंतर ते कसे विस्तारले जाईल, याचा ते सदैव विचार करायचे. त्यांनी बांधलेले गडकिल्ले हे याचे उत्तम उदाहरण आहे. असेही त्या म्हणाल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या