Friday, April 26, 2024
Homeनगरपर्यटन विकासाला चालना देण्यासाठी ‘नियोजन’मधून निधी - जिल्हाधिकारी भोसले

पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी ‘नियोजन’मधून निधी – जिल्हाधिकारी भोसले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून देता येईल, असे संकेत देत

- Advertisement -

जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी मंगळवारी (दि.2) सकाळपासून शहरातील विविध पर्यटनस्थळांना भेट देऊन त्यांची पाहणी सुरू केली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शहरालगतच्या भुईकोट किल्ला, चांदबिवी महाल, दमडी मस्जिद, बागरोजा हडको या ऐतिहासिक व पर्यटन स्थळांना भेटी देवून पाहणी केली. यावेळी नीलेश भदाणे, इतिहासाचे अभ्यासक भूषण देशमुख आदी उपस्थित होते. नगर शहराजवळ असणर्‍या या भागाला आणि वास्तूला भेटी दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, शहराला ऐतिहासिक वास्तू तसेच पर्यटन स्थळांचा वारसा लाभलेला आहे.

शहराच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी शासन आणि प्रशासन स्तरावरुन प्रयत्न केले जात आहे. त्याच अनुषंगाने विविध उपाययोजना करुन नगर शहरातील पर्यटनाला चालना देण्याचा यांचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या