Saturday, April 27, 2024
Homeनगरमहामार्गावरील हॉटेलमधून अवैध दारू विक्री

महामार्गावरील हॉटेलमधून अवैध दारू विक्री

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर तालुका पोलीस ठाणे (Nagar Taluka Police Station) हद्दीतून जाणार्‍या महामार्गावरील हॉटेलमधून (Hotel) खुलेआम अवैध दारूची विक्री (Illegal liquor Sale) होत असल्याचे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यातून (Police Raid) समोर आले आहे. पोलिसांनी नगर- सोलापूर महामार्गावरील (Nagar Solapur Highway) वाळुंज (Walunj) शिवारातील हॉटेल आरतीवर मंगळवारी (13 जून) सायंकाळी छापा (Raid) टाकला.

- Advertisement -

शिर्डीत अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय; मंत्रिमंडळाचा निर्णय

तेथे देशी- विदेशी दारूसह (Domestic and Foreign Alcohol) हातभट्टी दारूचा साठा मिळून आला आहे. एकुण 46 हजार 252 रूपये किमतीची अवैध दारू जप्त (Illegal Liquor Seized) करण्यात आली आहे. पोलीस अंमलदार कमलेश पाथरूट यांच्या फिर्यादीवरून उध्दव सोपान मोरे (वय 48 रा. वाळुंज) याच्याविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. नगर तालुका पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारूची निर्मिती केली जात असून पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानंतर पोलिसांनी त्यावर छापेमारी केली.

चढ्या दराने कपाशी बियाणे विक्री भोवली

त्यानंतर त्यांनी महामार्गावरील हॉटेलवरही छापेमारी करून अवैध दारूचा साठा (Illegal liquor Stock) पकडला आहे. दरम्यान, महामार्गावरील अनेक हॉटेलमध्ये खुलेआम अवैध दारूची विक्री होत असून या हॉटेलवर कारवाई करण्याचे धाडस नगर तालुका पोलीस दाखवणार का? असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे.

नेप्ती, निमगाव वाघा, खंडाळा शिवारातील हातभट्टी अड्डे उद्ध्वस्त

पोलीस अधीक्षक ओला (SP Rakesh Ola) यांच्या आदेशानुसार उपनिरीक्षक युवराज चव्हाण, अंमलदार पाथरूट, बांगर यांच्या पथकाने हॉटेल आरतीवर छापा टाकून कारवाई केली आहे.

विकासाच्या कामांची दोरी सरकारनेच कापली !

- Advertisment -

ताज्या बातम्या