Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरनगरमध्ये पोलीस कर्मचार्‍याला धक्काबुक्की

नगरमध्ये पोलीस कर्मचार्‍याला धक्काबुक्की

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचार्‍याला शिवीगाळ करून धक्काबुक्की करणार्‍या पाच जणांविरूद्ध

- Advertisement -

पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर शाम साठे (रा. नालेगाव, नगर), विजय राजू पठारे (रा. सिद्धार्थनगर, नगर) व त्यांचे तीन अनोळखी साथीदार यांचा विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई बी. एन. बडे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मयूर साठे याला अटक केली आहे. दुपारी सव्वा तीनच्या सुमारास चौपटी कारंजा येथे ही घटना घडली.

दुपारी तीन वाजेच्या सुमारास आरोपी हे दोन दुचाकीवरून येऊन चौपटी कारंजा येथे नागरिकांना विनाकारण शिवीगाळ करून हुल्लडबाजी करीत होते. यावेळी पोलीस शिपाई बी. एन. बडे हे त्यांच्या दुचाकीवरून पोलीस गणवेशात दिल्लीगेटकडे येत होते. त्यांनी आरोपींचा हुल्लडबाजीचा प्रकार पाहून त्यांना विचारणा केली.

हुल्लडबाजी का करता असा प्रश्‍न केला. यावेळी आरोपी बडे यांना म्हणाले, तु पोलीस असला म्हणून काय झाले, असे म्हणत शिवीगाळ व धक्काबुक्की केली. बडे यांनी तोफखाना पोलिसांना फोन करून माहिती दिली. तोफखाना पोलीस ठाण्याचे इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी मयूर साठे याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या