Wednesday, April 24, 2024
Homeनगरनगर आडते बाजार संघटनेकडून बंदची हाक

नगर आडते बाजार संघटनेकडून बंदची हाक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर आडते बाजार मर्चंटस (Nagar Aadte Bazaar Merchants) असोसिएशच्यावतीने केंद्र सरकारच्या निषेधार्थ (protest of the government) आज (मंगळवारी) एक दिवसीय लाक्षणिक बंद पाळण्यात येणार आहे. या बंदमध्ये जिल्ह्यातील तालुकास्तरावरील मार्केटमधील व्यापार्‍यांनी सहभागी होेण्याचे आवाहन नगर आडते बाजार संघटनेकडून करण्यात आले आहे.

- Advertisement -

केंद्र शासनाने (Central Government) अचानकपणे कडधान्ये, दाळी यावर कोणताही विचार न करता अत्यंत घाईघाईने साठवणुक मर्यादा (Storage limit) लागू केली. या प्रकारामुळे देशभरातील व्यापार्‍यांमध्ये मोठ्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याच्या निषेधार्थ (protest) अनेक राज्यातील कृषी उत्पन्नाचे व्यवसाय पुर्णपणे बंद पडले आहेत. नगरमधील सर्वात मोठ्या आडते बाजार मर्चंटस असोसिएशनकडून (Aadte Bazar Merchants Association) या नव्या नियमाचा निषेध करण्यासाठी एकदिवसीय लाक्षणिक बंदचे आवाहन केले आहे. या बंदमध्ये शहरातील दाळमंडई, आडतेबाजार, दाणेडबरा, मार्केटयार्ड परिसरातील सर्व व्यावसायिक सहभागी होणार आहेत. तसेच कडधान्यांचा व्यापार बेमुदत बंद करण्यात येणार असल्याचेही असोसिएशनकडून सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यातील तालुका मार्केटमधील व्यापार्‍यांनी यांनीही या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे नगर आहते बाजार मर्चंट्स असोसिएशनच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. शेतकर्‍यांनी व ग्राहकांनी या बंदची नोंद घ्यावी, असे आवाहन अध्यक्ष राजेंद्र चोपडा यांच्यावतीने करण्यात आले आहे. यावेळी आडते बाजार मर्चंटस असोसिएशनच्यावतीने जिल्हाचिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा उपनिबंधक, बाजार समितीचे पदाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या