Thursday, April 25, 2024
Homeनगरआता नागापूर अमरधाममध्ये होणार करोना मृतांवर अंत्यसंस्कार

आता नागापूर अमरधाममध्ये होणार करोना मृतांवर अंत्यसंस्कार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनामुळे मृत झालेल्या रुग्णांवर अंत्यविधीसाठी शहरातील अमरधाम अपुरे पडत आहे.

- Advertisement -

तर मृतदेह अमरधाममध्ये आणण्यासाठी काही रुग्णवाहिका चालक सात ते आठ हजार रुपयांची मागणी करत आहे. अशा परिस्थितीमध्ये सामाजिक भावनेने नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनने पुढाकार घेऊन नागापूर येथील कैलासधाम या स्मशानभूमीत करोना रुग्णांच्या अंत्यविधीची जबाबदारी उचलली आहे. तर करोना रुग्णांचे मृतदेह आणण्यासाठी अत्यल्पदरात शववाहिका देखील उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अंतोन गायकवाड यांनी दिली.

करोनाने शहरासह जिल्ह्याची परिस्थिती गंभीर बनली असताना, मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली. याचा ताण शहरातील एकमेव अमरधामवर पडत असताना दररोज 45 पेक्षा जास्त मृतदेह अंत्यसंस्काराला येत आहेत.

विद्युतदाहिनीची क्षमता 20 मृतदेहांची असताना उर्वरीत मृतदेहांची ओट्यावर चिता रचून अंत्यसंस्कार करण्याचे कार्य सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये केडगाव अमरधामच्या धर्तीवर नागापूर येथे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या सुचनेनुसार करोनाने मृत पावलेल्या मृतदेहाच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या