Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशNag Panchami 2021: स्त्रिया आणि नागपंचमी

Nag Panchami 2021: स्त्रिया आणि नागपंचमी

अहमदनगर | Ahmednagar

श्रावण (Shrawan) महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात नागपंचमी (Nag Panchami 2021) मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

- Advertisement -

नागाबद्दल (Nag) आदर आणि पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण साजरा केला जाण्याची परंपरा आहे. या सणानिमित्त घरोघरो नाग देवाची पूजा केली जाते. मान्यतेनुसार नागपंचमीच्या दिवशी नागाच्या १२ रुपांची पूजा केली जाते.

महिला, मुली तसेच नवविवाहिता यासाठी नागपंचमी हा सण म्हणजे एक खास आकर्षण असते. कारण नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया, मुली, झाडांना झोके बांधून, मनसोक्त झोके घेतात, गाणी म्हणतात. हौस म्हणून हातावरती मेंदी लावली जाते. या दिवशी स्त्रिया एकत्र येऊन झोके खेळणे, झिम्मा-फुगडी, फेर धरणे असे खेळ खेळतात.

ग्रामीण भागात तर नागपंचमीच्या आधी आठ दिवसांपासूनच महिला एकत्र येत फेर धरून, गाणी म्हणत हा सण साजरा करतात. नागपंचमीचे नवविवाहित मुलींना खूप अप्रूक असते. कारण लग्नानंतरची तिची पहिली नागपंचमी असते. नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत स्त्रिया पाळतात.

नागपंचमीबद्दल एक कथा प्रचलित आहे. ती म्हणजे एकदा एक शेतकरी शेतात नांगरट करत असताना त्याच्याकडून नागिनीची तीन पिल्ले चुकून मृत्युमुखी पडतात व नागिन चिडते व त्याला चावायला लागते, तेव्हा शेतकऱ्याची बायको त्या नागिनीची माफी मागते तिची पूजा करते. नागिन शेतकऱ्याला माफ करते. असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरट करत नाही, खोदत ही नाहीत व महिला या नागाची पूजा करतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या