Saturday, April 27, 2024
Homeनाशिकएचचसीजी मानवता कॅन्सर सेंटरला एनएबीएच, एनएबीएल सर्टिफिकेशन

एचचसीजी मानवता कॅन्सर सेंटरला एनएबीएच, एनएबीएल सर्टिफिकेशन

नाशिक | प्रतिनिधी

कर्करोगग्रस्तांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रभावी उपचार करणाऱ्या एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरला वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च अशा एनएबीएच व एनएबीएल सर्टिफिकेशन मिळाले आहे. अशा स्वरुपाचा बहुमान मिळविणारे हे उत्तर महाराष्ट्रातील पहिले व एकमेव हॉस्पिटल आहे, अशी माहिती एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक तथा चीफ ऑफ सर्जिकल ऑन्कॉलॉजी अॅॅण्ड रोबोटीक सर्विसेस प्रा. डॉ. राज नगरकर यांनी दिली.

- Advertisement -

अधिक माहिती देताना प्रा. डॉ. राज नगरकर म्हणाले की कर्करोगग्रस्तांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देतांना नेहमीच गुणवत्तेचा ध्यास ठेवला आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रासह ठाणे, पुणे, मराठवाडा असे राज्यभरातून व दक्षिण गुजराथमधून रुग्ण उपचारासाठी येत असतात. सदैव त्यांना उत्तमोत्तम सेवा प्रदान करण्याचा ध्यास राहिला आहे. गुणवत्ता टिकून राहावी, याकरीता हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधांचे मानांकन करण्यास प्राधान्य दिला गेला आहे.

गेल्या २०१२ मध्ये एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर एनएबीएस सर्टिफिकेशन प्राप्त करताना दर्जेदार सुविधेचे महत्त्व अधोरेखीत केले होते. तेव्हा राष्ट्रीय पातळीवर असे सर्टिफिकेशन प्राप्त करणारे पहिल कॅन्सर हॉस्पिटल होण्याचा बहुमान मिळविला होता. तसेच गेल्या नऊ वर्षांपासून सर्टिफिकेशन करतांना गुणवत्तेत कुठल्याही स्वरूपाची तडजोड केलेली नाही.

आणखी एक पाऊल पुढे टाकत एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरचे मुंबई-आग्रा महामार्गावरील नवीन युनीटला एनएबीएच सर्टीफीकेशन मिळाले आहे. तसेच येथील लॅबरोटरीला एनएबीएल सर्टिफिकेशनचा बहुमान मिळाला आहे. अशा दोन्ही स्वरूपाचे सर्टिफिकेशन मिळविणारे एचसीजी मानवता कॅन्सर है उत्तर महाराष्ट्रातील पहिले व एकमेव रुग्णालय असल्याचे समाधान डॉ नगरकर यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी सीओओ अमन सिंग अहलुवालिया, पॅथोलॉजीच्या एचओडी व लॅब डायरेक्टर डॉ. सुचिता गंधे, मार्केटींग हेड स्वप्नील आवळे, कालिटी हेड संजय बोरकर, पॅथलॉजीचे कालीटी मॅनेजर मयुर केदारे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या