Saturday, April 27, 2024
Homeनाशिकमाणूस म्हणून जगवण्याचे धेर्य देणारी संस्था नॅब : डॉ. शशिकला वंजारी

माणूस म्हणून जगवण्याचे धेर्य देणारी संस्था नॅब : डॉ. शशिकला वंजारी

सातपूर l Satpur (प्रतिनिधी)

दृष्टीहीन बांधवांंना आपण सक्षम असल्याचे सिध्द करण्याची संधी नॅबमुळे उपलब्ध होत आहे. माणसाला माणूस म्हणून जगवण्याचे धेर्य देणारी संस्था नॅब खरोखर अतुलनिय कार्य करीत असल्याचे गौरवोद्गार एसएनबीटी विद्यापिठाच्या कुलगूरू डॉ. शशिकला वंजारी यांनी काढले.

- Advertisement -

नॅब महाराष्ट्रच्या माध्यमातून राज्यभरात शिक्षणदान करणार्‍या शिक्षकांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कुलगूरू डॉ.वंजारी बोलत होत्या.कार्यक्रमात व्यासपिठावर सपकाळ नॉलेज हबचे चेअरमन रविंद्र सपकाळ, नॅब महाराष्ट्रचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, उपाध्यी सुर्यभान साळूंखे, सरचिटणिस गोपी मयूर, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, मंगला कलंत्री हे होते.

यावेळी बोलताना डॉ. वंजारी म्हणाल्या की,भारतातील भारतीय युवकांची भारताबद्दलची संकल्पना स्पष्ट असणे गरजेचे आहे. दृष्टी असूनही अनेकवेळा डोळस माणसेन पाहील्या सारखे करीत असतात. मात्र दृष्टीहीन कोणाच्या आशेवर नाही तर स्वत:च्या कतृत्वावर आपली क्षमता सिध्द करीत आहे. हे पाहुन खूप समाधान वाटल्याचे सांगितले.

यावेळी रवींद्र सपकाळ यांनी दृष्टीहीन संबोधनातील बोच मोठी आहे. त्यांच्या भावना सांभाळण्या सोबतच त्यांना प्रोत्साहन देत गरुड झेप घेण्याचे स्वप्न दाखवणारे नॅबचे कार्य मोठे असल्याचे सांगितले. केजी टू पीजी,पर्यंत शिक्षण देताना त्यात दृ्ष्टीबाधित विद्यार्थी नसल्याची खंत व्यक्त करताना रवींद्र सपकाळ यांनी अश्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली. तसेच नॅबच्या कार्याला मदत म्हणून 51 हजार रुपयांची भेट जाहीर केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रामेश्वर कलंत्री यांनी नॅबच्या कार्याचा आढावा सादर केला. पाहुर्‍यांचा परिचय डॉ. प्रा. सुहास धांडे व गोपीमयू यानी करुन दिला. सूत्रसंचलन श्यम पाडेकर यांनी केले. तर आभार मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यानी मानले.

यावेळी औरंगाबादचे प्रा. प्रतिप देशपांडे, वाशीच्या संगिता पूंड, रत्नागिरीचे साहरवी जाधव, नागपूरचे विवेक रोहकरे, कैलास निकम या प्राद्यापकांसोबतच अंध बांधवांच्या विकासासाठी काम करणार्‍या अहमदनगरच्या अनाम प्रेमी या संस्थेचीही सत्कार करण्यात आला.

प्राध्यापकांंसह शिक्षक,क्रिडा शिक्षक, विशेष कार्य करणारे व संस्था अश्या 72 जणांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमाला शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, प्रा.भास्कर गिरधारी, प्रा.अश्विन भारद्वाज, प्रा सिंधू काकडे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या