Thursday, April 25, 2024
Homeनगरना. गडाखांनी घेतली महंत भास्करगिरी महाराजांची दर्शन भेट

ना. गडाखांनी घेतली महंत भास्करगिरी महाराजांची दर्शन भेट

नेवासा |का. प्रतिनिधी|Newasa

‘अयोध्या’ भूमीतून आलेल्या श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज यांची राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेत दर्शन घेऊन सत्कार केला. यावेळी महंत भास्करगिरी महाराज यांनी नामदार गडाख यांना राम मंदिर परिसराचा संपूर्ण आराखडा दाखविला.

- Advertisement -

संपूर्ण देशाची अस्मिता समजल्या जाणार्‍या अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन समारंभासाठी विशेष निमंत्रणावरून गेलेले नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरी महाराज नुकतेच परतले आहेत. याचे औचित्य साधून ना. गडाख यांनी तातडीने महंत भास्करगिरी महाराजांची भेट घेऊन दर्शन घेत त्यांचा प्रवास तसेच भूमिपूजन समारंभाची आस्थेवाईकपणे चौकशी केली.

या कार्यक्रमाची अगदी बारीकसारीक माहिती ना.गडाख यांनी महंत भास्करगिरी महाराजांकडून घेऊन त्यांच्या देशपातळीवर झालेल्या सन्मानाबद्दल समाधान व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या