Thursday, April 25, 2024
Homeनगरकोपरगाव नगरपरिषदेमध्ये माझी वसुंधरा अभियान

कोपरगाव नगरपरिषदेमध्ये माझी वसुंधरा अभियान

कोपरगाव (प्रतिनिधी) –

कोपरगाव नगरपरिषदेमध्ये माझी वसुंधरा या अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी शपथ घेण्यात आली. निसर्गाशी असलेली कटिबद्धता

- Advertisement -

निश्चित करण्यासाठी निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वावर पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग कार्य करीत आहे. या संबंधित माझी वसुंधरा अभियान राबविले जात आहेत. अभियानाचे मूल्यमापन करण्यासाठी एकूण 1500 गुण ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये हरित आच्छादन व जैवविविधता, घनकचरा व्यवस्थापन, वायू गुणवत्ता, जलसंवर्धन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, नदी, तळे व नाले यांची स्वच्छता, सांडपाणी मैला व्यवस्थापन व प्रक्रिया, सौर ऊर्जा, हरित इमारतींची संख्या, पर्यावरण सुधारणा व संरक्षणासाठी जनजागृती व निसर्ग संवर्धनासाठी नागरिकांनी घेतलेली शपथ या बाबींचा अंतर्भाव केला आहे. या बाबींचे मूल्यमापन 1 एप्रिल 2021 ते 31 मे 2021 या कालावधीत त्रयस्थ यंत्रणेमार्फत करण्यात येणार आहे. याचा निकाल व बक्षिस वितरण 5 जून 2021 जागतिक पर्यावरण दिनी करण्यात येणार आहे.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गुरुवारी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेनी माझी वसुंधरा अभियान शपथ घेण्याचे निर्देश होते. त्या अनुषंगाने कोपरगाव नगरपरिषद कार्यालयाच्या प्रांगणात नितेश मिरीकर, सहा. नगररचनाकार यांनी वसुंधरा रक्षण व संवर्धनासाठी उपस्थित सर्वांना शपथ दिली. यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे, नगरसेवक शिवाजी खांडेकर, दिपक जपे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी सुनील गोरडे यांच्या सह सर्व विभाग प्रमुख, सर्व अधिकारी व कर्मचारी, नागरिक होते.

उपमुख्याधिकारी सुनील गोरडे यांनी माझी वसुंधरा अभियानाचे आणि स्वच्छ सर्वेक्षण 2021 बाबत प्रास्ताविक केले. यावेळी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देवून. माझी वसुंधरा अभियानाचे महत्व व आपल्या जबाबदा-या याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

ही शपथ घेण्यासाठी नागरिकांनी majhivasundhara.in या संकेतस्थळाला भेट देऊन EPledge ला क्लिक करून शपथ घ्यावी. या संकेतस्थळावर शपथेचे विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ही शपथ घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीस प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध होणार आहे. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने पर्यावरण रक्षणासाठी शपथ घ्यावी आणि त्याबाबत स्वत: अंगीकार करून अभियानाचा प्रचार व प्रसार करवा व वसुंधरेचे संरक्षण करावे असे आवाहन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या