Saturday, April 27, 2024
Homeनाशिक'माझे कुटुंब माझी जबाबदारी' उपक्रमाची सीईओ यांच्याकडून गाव पातळीवर पाहणी

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ उपक्रमाची सीईओ यांच्याकडून गाव पातळीवर पाहणी

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोडे यांनी नाशिक तालुक्यातील ग्रामपंचायत बेलगावढगा येथे भेट देऊन माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमाच्या अंमलबजावणीची प्रत्यक्ष पाहणी केली.

- Advertisement -

यावेळी बनसोडे यांनी प्रत्येक गावातील ग्रामस्थांशी संवाद साधून स्वतः काही कुटुंबातील सदस्यांचे “पल्स आँँक्सीमिटर” व “थर्मल स्कँनींगने” तपासणी केली.

ग्रामस्तरावर सुरू असलेल्या कामकाजाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. करोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्स तसेच अन्य सर्व शासन नियमांचे पालन करण्याच्या व बिना मास्क बाहेर फिरणा-या व्यक्तिंना दंड आकारण्याच्या सुचनाही त्यांनी ग्रामपंचायतीला दिल्या.

यावेळी गटविकास अधिकारी डॉ. सारिका बारी, विस्तार अधिकारी श्रीधर सानप, उपसरपंच सुधाकर जाधव, ग्रामसेवक शिंदे, डॉ. सचिन हिरे, आरोग्य सेविका खेमनार, आरोग्य सेवक देवरे, आशा गटप्रवर्तक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व ग्रामपंचायत सेवक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या