Friday, April 26, 2024
Homeनाशिकमविप्र समाज सेवक सोसायटी कर्ज, ठेवींवर व्याजदर ७ टक्के

मविप्र समाज सेवक सोसायटी कर्ज, ठेवींवर व्याजदर ७ टक्के

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज सेवक सहकारी सोसायटी संस्थेने कर्जावरील व ठेवीवरील व्याजदर ९ टक्यांवरून ७ टक्के केला असून, कर्ज मयार्दा २५ लाखावरून ५० लाखापर्यंत करून सभासदांना नविन वर्षांची भेट दिली आहे.

- Advertisement -

सदर नियम १ जानेवारी २०२१ पासुन लागु केल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष प्रा. नानासाहेब त्र्यंबक दाते, उपाध्यक्ष प्रमोद जाधव व मानद चिटणीस सुप्रिया सोनवणे यांनी दिली.

सोसायटीची विशेष सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. यात संचालक मंडळाने सुचविलेल्या पोटनियमच्या दुरूस्तीस मान्यता देणे या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर तातडीने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविला. जिल्हा उपनिंबधक सतिश खरे यांनी उपरोक्त विषयांना मंजुरी दिली.

त्यामुळे सोसायटीच्या सभासदांच्या कर्जावरील व्याज व ठेवीवरील व्याज समान म्हणजे ७ टक्के प्रमाणे व्याजदर आकारणारी राज्यातील ही एकमेव पतसंस्था झाली आहे. तसेच वेतनाच्या ७५ टक्के नुसार दिर्घ कर्ज ५० लाखापर्यंत व आ. कर्ज ७५ हजारापर्यंत व सण कर्ज १० हजारापर्यंत इतक्या मोठया प्रमाणात कर्ज वाटप करणारी ही एकमेव संस्था आहे.

या नविन नियमाते सभासदांने स्वागत केले आहे. आमदार दिलीप बनकर व मविप्रचे शिक्षणाधिकारी सी. डी. शिंदे यांनी या कामी मोलाचे सहकार्य केले.

यावेळी सोसायटीचे ज्येष्ठ संचालक गुलाबराव भामरे व सोसायटीचे संचालक बाळासाहेब मोगल, परशुराम कथले, अशोक बाजारे, भागवत गवळी, चित्तरंजन न्याहारकर, बळीराम जाधव, लहू कोर, प्रा. राजेंद्र पाटील, केशव शिरसाठ, प्रा. प्रकाश पवार, संजय नागरे, किरण उघडे, सुवर्णा कोकाटे व सेवक वर्ग आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या