Wednesday, April 24, 2024
Homeनगरमुठेवाडगावच्या पसार व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल

मुठेवाडगावच्या पसार व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील विविध गावांतील 47 शेतकर्‍यांचा शेतमाल खरेदी करुन 16 लाख 61 हजार रुपयांची फसवणूक केलेल्या

- Advertisement -

दोन व्यावसायिकांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यासंदर्भात विजय आसणे (रा. माळवाडगाव) या शेतकर्‍यांने दिलेल्या फिर्यादीवरुन रमेश मुथ्था, चंदन मुथ्था (रा. माळवाडगाव) दोघांविरुद्ध शेतकर्‍यांची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा अखेर दाखल करण्यात आला.

वरील दोन्ही पसार व्यावसायिकांनी तालुक्यातील विजय आसने, केशव आसने, कृष्णा मुठे, बाबूराव मुठे, (सर्व. रा. माळवाडगाव), पोपट काळे, गणेश जोशी, किशोर पटारे, सोन्याबापू विधाटे (सर्व. रा. भोकर), शिवाजी राऊत (रा. उंदीरगाव) यांच्याकडुन 11 लाख 8 हजार रुपयांचा सोयाबीन, मका, हरभरा, बाजरी, गहू खरेदी करुन धनादेशांसह धान्य खरेदीच्या पावत्या दिल्या. तालुक्यातील विविध गावांतील 47 शेतकर्‍यांचा शेतमाल खरेदी करुन 16 लाख 61 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमुद केले आहे.

व्यावसायिक मुथ्था कुटूंबासह शनिवारी (ता. 6) मध्यरात्री माळवाडगाव येथून पसार झाल्याने शेतकरी वर्गातुन संताप व्यक्त होत आहे. संतप्त शेतकर्‍यांनी दोन दिवसांपुर्वी आमदार लहू कानडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांची भेट घेवून गुन्हा दाखल करुन कडक कारवाईच्या मागणीचे निवेदन दिले होते. त्यानंतर तालुका पोलीस ठाण्यात 47 शेतकर्‍यांच्या तक्रारी आल्यानंतर आज सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी पोलीस निरिक्षक मसूद खान अधिक तपास करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या