Friday, May 10, 2024
Homeनाशिकईदगाहवर प्रस्तावीत बस टर्मिनलला मुस्लिम समाजाचा विरोध

ईदगाहवर प्रस्तावीत बस टर्मिनलला मुस्लिम समाजाचा विरोध

जुने नाशिक | Nashik

मागील सुमारे 400 वर्षापासून नाशिक शहर परिसरातील लाखो भाविक ज्या शाहजानी ईदगाह मैदानावर रमजान ईद, बकरी ईदच्या वेळी नमाज पठण करतात, त्या मैदानावर मनपाकडून बस टर्मिनल तयार करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.

- Advertisement -

या प्रस्तावाला विरोध करीत मनपाचे त्वरीत प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन देऊन करण्यात आली.आज (दि.28) दुपारी खतीब-ए-नाशिक हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजाच्या शिष्टमंळाने आयुक्त कैलास जाधव यांची भेट घेत चर्चा करुन निवेदन दिले.

सुमारे 400 वपर्षापासून मुस्लिम बांधव या ठिकाणी नमाज पठण करतात. ही शाहजानी ईदगाह मैदानाची जागा शासन वक्फ ट्रस्ट नोंदणीकृत आहे. या जागेच्या सातबारा उतार्‍यावर देखील मुस्लीम समाजाचे नाव असल्याने नमुद करीत महापालिकेने या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नाये, अशी मागणी करण्यात आली.

नगरसेवक मुशीर सय्यद, नगरसेविका समीना मेमन, नगरसेविका शाहीन मिर्झा, आशा तडवी, माजी नगरसेवक हाजी निजाम कोकणी, गुलजार कोकणी, हनिफ बशीर, रजा अकॅडमीचे एजाज रजा, हाजी जाकीर, सलीम पटेल, साजीद मुल्तानी, सलिम मिर्झा, शरीफ भजिवाले आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या