Friday, April 26, 2024
Homeमनोरंजनसुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे निधन

सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे निधन

मुंबई | Mumbai

प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे निधन झाले आहे. ते 47 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या धक्क्याने आज (गुरुवार, 10 डिसेंबर) पहाटे त्यांचे निधन झाले.

- Advertisement -

वैकुंठधाम येथे आज सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. तत्पूर्वी सकाळी 9.30 वाजता डॉन स्टुडिओ येथे त्यांचे पार्थीव अंतिमदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

शास्त्रीय संगीताला आधुनिक बाज देत सुरवटींची गुंफन आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचविण्यात नरेंद्र भिडे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. नरेंद्र भिडे यांनी अनेक नाटक, चित्रपट आणि अल्बम्सला संगित दिले. त्यांच्या अकाली जाण्याने त्यांचे चाहते आणि संगीत वर्तुळात दु:ख व्यक्त केले जात आहे.

सिव्हिल इंजिनिअरची पदवी घेतलेल्या संगीतकार नरेंद्र भिडे यांनी अनेक नाटक, मालिका, मराठी चित्रपट संगीतबद्ध केले होते. त्यांनी महम्मद हुसेन खान साहेब, स्वरराज छोटा गंधर्व, बाळासाहेब मते, शैला दातार, सुधीर दातार, सुहास दातार यांच्याकडे भारतीय शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले होते. तर, हेमंत गोडबोले यांच्याकडे त्यांनी पाश्चिमात्य संगीताचं शिक्षण घेतलं होतं. नरेंद्र भिडे यांनी अनेक नाटक, मालिका, चित्रपट, जिंगल्सच्या माध्यमातून संगीतक्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या