Friday, May 10, 2024
Homeनाशिकनाशिक येथे आळंबी (मशरूम) लागवड प्रशिक्षण

नाशिक येथे आळंबी (मशरूम) लागवड प्रशिक्षण

नाशिक | प्रतिनिधी

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नाशिक व कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे (दि. २५ ते २९जुलै) मशरूम लागवड प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

या प्रशिक्षणात मशरूमचा इतिहास व ओळख, खाण्यास योग्य मशरूमच्या जाती व प्रकार मशरूमचे आहारातील महत्व औषधी उपयुक्तता, स्पान तयार करण्याचे तंत्र, भिंगरी मशरूम लागवड, भाताच्या काडीवरील मशरूम लागवड स्पानिंगची साठवणूक पद्धती, तळघरात भिंगरी मशरूम लागवड, मशरूमचे शत्रू व त्याचा बंदोबस्त, मशरूमपासून तयार होणारे विविध पदार्थ, यशस्वी मशरूम लागवडीसाठी परिस्थित घटकांचे व्यवस्थापन, त्यावर प्रात्यक्षिक प्रशिक्षण बटन मशरूम लागवड तंत्र, बटन मशरूम लागवडीसाठी लागणारे घटक, बटन मशरूम लागवडीसाठी घ्यावयाची काळजी, बटन मशरूम काढणी तंत्र या विषयावर माहिती तसेच उद्योजकीय व्यक्तिमहत्व विकास, शासनाच्या मशरूम उद्योगाशी निगडीत शासनाच्या योजना, बाजारपेठ पाहणी, प्रकल्प अहवाल, विक्री कौशल्य, ह्या विषयावर उद्योजकता विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

ह्या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी किमान ७ वी पास वय किमान १८ वर्ष पूर्ण व मशरूग लागवड करण्याची तीव्र इच्छा असणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी प्रशिक्षणार्थीचा फोटो व आधारकार्ड आवश्यक आहे. यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.

या प्रशिक्षण शिबिराच्या अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठी रविंद्र आहेर कार्यक्रम समन्वयक, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, उद्योग भवन, शासकीय आय टी आय जवळ, त्रंबकरोड, सातपूर नाशिक यांच्याशी संपर्क करावा असे अहवान प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, नाशिक यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या