Thursday, April 25, 2024
Homeधुळेचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून

पिंपळनेर / वार्ताहर : Dhule

साक्री तालुक्यातील बारीपाडा येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना काल सकाळी घडली. मयत पत्नीच्या मुलाने पिंपळनेर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पतीस अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

बारीपाडा (ता.साक्री) येथे वसंत राजाराम चौधरी (वय 48) यांच्या दोन मुलींचे लग्न झाले असून बारीपाडा येथे पत्नी कमलबाई वसंत चौधरी व मुलगा नाव जिभाऊ राहत आहे. वसंतला दारूचे व्यसन असल्याने मद्य पिऊन आल्यावर चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला नेहमी मारहाण करत असे. शनिवारी सकाळी घरून दोघं पती-पत्नी शेतात गेले असता सकाळी 11 वाजेच्या सुमारास दोघं दारूच्या नशेत असताना दोघा पती-पत्नीमध्ये भांडण झाले.

भांडण विकोपास जाऊन रागाच्या भरात वसंतने जोरदार

गळा आवडल्याने (दाबल्याने), पत्नी कमलबाई चौधरी (वय 35 वर्ष) हिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असून वसंतने खुनाची कबुली दिल्याने त्यास अटक केली आहे. याप्रकरणी कमलबाईचा मुलगा जिभाऊ वसंत चौधरी (रा. बारीपाडा) याने पिंपळनेर पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी पती वसंत चौधरी याच्या विरोधात रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम करीत होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या