Friday, April 26, 2024
Homeनगरतरूणावर खूनी हल्ला करणारे तिघे भाऊ गजाआड

तरूणावर खूनी हल्ला करणारे तिघे भाऊ गजाआड

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

तलवार, कुर्‍हाड व लाकडी दांडक्याने तरूणावर हल्ला करणार्‍या तिघा भावांना तोफखाना पोलिसांनी अटक केली. सागर दीपक देठे, राहुल दीपक देठे, निलेश देठे (सर्व रा. नालेगाव, अहमदनगर) अशी अटक केेलेल्या आरोपींचे नावे आहेत. त्यांनी सोमवारी रात्री नालेगावातील वारूळाचा मारूती कमानीजवळ अनिल लक्ष्मण गायकवाड (वय 32 रा. माळीवाडा, अहमदनगर) या तरूणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. जखमी अनिलवर पुणे येथील ससुन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याने उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून पाच जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

अनिल गायकवाड हा सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरून दिल्लीगेट येथून माळीवाडा येथे जात असताना त्यांना सागर देठे याने नालेगावातील वारूळाचा मारूती कमानीजवळ थांबविले व त्यांच्या कानाखाली मारली. अनिल यांनी कानाखाली मारल्याचा जाब विचारला असता राहुल, निलेश, दीपक व त्याची पत्नी हे तेथे आले. त्यांनी अनिल यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. दीपक याने त्याच्याकडील कुर्‍हाडीने अनिल यांच्या हातावर मारली तर सागरने त्याच्याकडील तलवारीने अनिलच्या डोक्यावर वार करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पसार झाले होते. त्यातील तिघांना तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या गुन्ह्यातील दीपक देठे व त्याची पत्नी पसार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या