Thursday, April 25, 2024
Homeनगरपालिकांचा प्रभाग रचनेचा प्रारूप मसुदा जिल्हाधिकार्‍यांना सादर

पालिकांचा प्रभाग रचनेचा प्रारूप मसुदा जिल्हाधिकार्‍यांना सादर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmedngar

जिल्ह्यातील नऊ नगर पालिकांची मुदत संपलेली असून याठिकाणी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार निवडणूक प्रक्रियेची पूर्व तयारी म्हणून 2 मार्चपर्यंत निवडणुका असणार्‍या पालिकांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रारूप प्रभाग रचनेचा मसुदा तयार करून तो जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार जिल्ह्यातील 9 पालिकांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संबंधित मसुदा जिल्हाधिकार्‍यांना सादर केला असून येत्या 7 तारखेला संबंधित प्रारूप प्रभाग रचना जिल्हाधिकारी प्रसिध्द करणार आहेत.

- Advertisement -

जिल्ह्यातील श्रीरामपूर, संगमनेर, राहुरी, राहाता, देवळाली प्रवरा, कोपरगाव, शेवगाव, पाथर्डी आणि जामखेड पालिकांची मुदत संपलेली असून त्याठिकाणी आता निवडणुका होणार आहेत. यासाठी आधी याठिकाणी प्रभाग रचना तयार करून ती प्रसिध्द करून त्यावर हरकती आणि सुनावणी घेण्यात येणार आहेत. या प्रारूप रचनेत प्रभाग संख्या, प्रभागनिहाय एकूण अनुसूचित जाती, तसेच जमाती यांची 2011 च्या लोकसंख्या, क्षेत्र, सीमांकन, व नकाशे पूर्ण त्यात्या पालिका मुख्य कार्यकारी अधिकारी 2 मार्चपर्यंत जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार जिल्ह्यातील नऊ पालिका मुख्य कार्यकारी अधिकारी संबंधीत माहिती जिल्हाधिकार्‍यांना सादर केली आहे. आता सोमवार (दि.7) रोजी जिल्हाधिकारी प्रारूप रचना प्रसिध्द करणार असून त्यावर 10 ते 17 मार्चपर्यंत हरकती आणि सुचना घेऊन 22 मार्चला सुनावणी घेऊन अंतिम प्रभाग रचना 1 एप्रिला जाहीर करणार आहेत.

ओबीसींशिवाय होणार पालिका निवडणुका?

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानूसार आता ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका होणार आहेत. जिल्ह्यातील 9 पालिका निवडणूका देखील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी शिवाय होणार असल्याने ओबीसी उमेदवार, ओबीसी समाज आता भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या