Saturday, April 27, 2024
Homeनाशिकमनपा शाळा होणार स्मार्ट

मनपा शाळा होणार स्मार्ट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पालकमंत्री दादाजी भुसे (Guardian Minister Dadaji Bhuse) यांनी पंचक भागातील मनपा शाळा (Municipal School) क्रमांक 49 मध्ये बैठक घेत स्मार्ट सिटीकडून (Smart City) होणा-या स्मार्ट स्कूल प्रकल्पाचा (Smart School Project) आढावा घेतला.

- Advertisement -

यावेळी शाळा स्मार्ट (smart school) करण्याबरोबर स्वच्छतागृहे, कंपाऊंड, खेळ सामुग्री, डिजीटल साहित्य या मुद्यांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे असे ना. भुसे (dada bhuse) यांना सांगितले.

मनपा आयुक्त डॉ. चंद्रकात पुलकुंडवार (Municipal Commissioner Dr. Chandrakat Pulkundwar) यांनी स्वागत केले. विद्यार्थ्यांनी (students) लेझीम आणि ढोल वादन करुन स्वागत केले. ना. भुसे यांनी दुसरी ‘क’ च्या वर्गात जाऊन मुलांशी संवादही साधला. त्यांची अक्षरओळख क्षमता तपासली. यावेळी विद्यार्थ्याने इंग्रजी कविता म्हणून शाबासकी मिळवली. स्मार्ट शाळा करताना नाविण्यपूर्व प्रयोग करा, पुस्तकी शिक्षणाबरोबर क्रिडा (sports), विद्यार्थ्यांचे आरोग्य (sudents health) या घटकांकडेही लक्ष देण्याची सुचना पालकमंत्र्यांनी केली.

मनपा शाळेच्या 74 इमारतींपैकी पाच इमारतींची स्थिती योग्य नाही. त्या इमारतींचीही त्वरीत दुरुस्ती किंवा नवीन बांधकाम करण्याचे नियोजन करावे त्यासाठी सीएसआर फंडाचीही (CSR Fund) मदत घ्यावी, असे आदेश दिले. सध्या मनपा शाळेतील विद्यार्थी संख्या 29 हजार आहे. काही वर्षांपूर्वी ती 40 हजार होती. पुढच्या वर्षी 50 हजार विद्यार्थ्यांचे टार्गेट ठेवू, खासगी शाळेतील विद्यार्थी मनपा शाळेत आले पाहिजेत त्यासाठी मनपा शाळांची गुणवत्ता वाढविणे गरजेचे आहे. स्मार्ट स्कूल हा त्याचाच रोड मॅप आहे, असेही ना. भूसे यांनी सांगितले.

मनपाच्या 69 शाळा स्मार्ट होणार

मनपाच्या 69 शाळा स्मार्ट स्कूल होणार आहेत. एकूण 656 स्मार्ट क्लास, 69 संगणक प्रयोगशाळा, 69 मुख्याध्यापक कक्ष असणार आहेत. त्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गंत 70 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या बैठकीत प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. नोव्हेंबर महिना अखेरीस वर्क ऑर्डर मिळून डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या