Saturday, April 27, 2024
Homeनाशिकधक्कादायक : लाच स्वीकारताना मनपा अधिकाऱ्याला अटक

धक्कादायक : लाच स्वीकारताना मनपा अधिकाऱ्याला अटक

मालेगाव l Malegaon (प्रतिनिधी)

मेडिकल दुकान टाकण्यासाठी कराची थकबाकी नसलेला परवाना देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना मनपा प्रभाग अधिकारी तथा प्रभारी नगरसचिवासह लिपिकास लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज रंगेहात पकडले. सकाळी 11 वाजेच्या सुमारास मनपा नगरसचिव कार्यालयात झालेल्या या कारवाईने मनपा वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

शहरातील रौनकाबाद भागात मेडिकल दुकान टाकण्यासाठी कराची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी प्रभाग कार्यालय 4 मधील लिपिक हिरालाल गागड यांनी तीन हजार रुपयांची मागणी केली होती. या संदर्भात सदर तक्रारदाराने नाशिक येथे लाचलुचपत विभागात नगर सचिवांसह लिपिका विरुद्ध तक्रार दाखल केली होती.

प्रभाग अधिकारी पंकज नामदेवराव सोनवणे तसेच लिपिक हिरालाल गागडा या दोघांवर किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती

सदर तक्रारीवरून लाचलुचपत विभागाच्या पो नि मृदुला नाईक यांच्या नेतृत्वाखाली पथकाने मनपात नगरसचिव विभागात सकाळी 11 वाजेच्या सुमारास सापळा लावला होता.

तक्रारदाराकडुन नगर सचिव पंकज सोनवणे यांनी तीन हजारांची लाच स्वीकारताना पथकाने त्यांना ताब्यात घेतले.

या प्रकरणी सोनवणे व लिपिक गांगड यांच्या विरोधात जिल्हा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या