Thursday, April 25, 2024
Homeनगरपालिका दवाखान्यात करोना रुग्णांचा स्वॅब घेण्यास नगराध्यक्षांचा विरोध

पालिका दवाखान्यात करोना रुग्णांचा स्वॅब घेण्यास नगराध्यक्षांचा विरोध

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

लहान बालके व नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून संशयित करोना रुग्णांचा थ्रॉट स्वॅब नमुना चाचणी

- Advertisement -

नगरपरिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घेण्यास नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी विरोध दर्शविला आहे.

गुरुवारी प्रांताधिकारी कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आ. लहू कानडे यांनी संशयित करोना रुग्णांचा थ्रॉट स्वॅब नमुना चाचणी नगरपरिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घेण्यात यावी अशी सूचना केली होती.

तसेच पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनीही रुग्ण वाहून नेण्यासाठी वाहनाची सुविधा देण्याची तयारी दर्शविली, त्यानुसार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी काल पालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचीन पर्‍हे व प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री. उबाळे यांना काल लेखी पत्र देऊन पालिकेच्या रुग्णालयात करोना संशयितांचे घशाचे स्त्राव घेण्याचे आदेश दिले.

या निर्णयाचा नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी निषेध करून अशा चाचण्या नगरपालिका रुग्णालयात घेतल्या जाऊ नयेत कारण या प्रा.आ.केंद्रात शहरातील नवजात बालकांना लसीकरणासाठी आणले जाते, गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात.

त्यामुळे याठिकाणी चाचणी करण्यात येऊ नये. यात बालकांच्या जीवनाचा तसेच गोरगरिब नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नगरपालिका रुग्णालयात अशा प्रकारची ही चाचणी याठिकाणी करू नये, असे नगराध्यक्षा आदिक यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या