Saturday, April 27, 2024
Homeजळगावमनपा अतिक्रमण विभाग अ‍ॅक्शन मोडवर

मनपा अतिक्रमण विभाग अ‍ॅक्शन मोडवर

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

दोन महिन्यानंतर महापालिकेच्या आयुक्तपदाची वाद मिटल्यानंतर आज आयुक्त डॉ. विद्या गायकवाड (Commissioner Dr. Vidya Gaikwad) या रस्त्यावर उतरून रस्त्याला अडथळा ठरणार्‍या अंजिठा चौफुली (Anjitha Chauphuli) येथील मुख्य रस्त्यांवरील (main roads)अतिक्रमण काढण्याची कारवाई (remove encroachment) मंगळवारी करण्यात आली. एसटी वर्क शॉप पासून ते अंजिठा चौफुली तसेच महामार्गाचे चारही बाजूचे सुमारे 85 अतिक्रमीत टपर्‍या काढण्यात आल्या.

- Advertisement -

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे मंगळवारी पोलीस बंदोबस्तात शहरातील अजिंठा चौक परिसरातील अतिक्रमित वर टपर्या हटविण्यात आल्या. यावेळी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या उपस्थितीत अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.अजिंठा चौकाच्या चारही बाजूंनी वाहतुकीची कोंडी होत होती.

अनेकदा अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून महापालिका प्रशासनातर्फे वारंवार अतिक्रमण हटविण्याबाबत सांगण्यात येत होते. अखेर महापालिका प्रशासनाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने मंगळवारी सकाळी दहा पासून धडक कारवाई मोहीम राबवीत अतिक्रमित 85 वर टपर्यांसह विक्रेत्यांच्या हातगाड्याही जप्त करण्यात आल्या.

अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक नारायण नस्ते, संजय ठाकूर यांच्यासह पथकाने तगडा पोलीस बंदोबस्तात अंजिठा चौक ते एस. टी. वर्क शॉप दरम्यान तसेच महामार्गावरील दोन्ही बाजूचे अतिक्रमण कारवाईची करण्यात आली.

दोन जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

अतिक्रमण कारवाई दरम्यान अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी आणि अतिक्रमण धारक यांच्या अनेक ठिकाणी वाद झाले. दोन ठिकाणी अतिक्रमण पथक व अतिक्रमणधारक यांच्यात शाब्दीक वाद विकोपाला जावून वाद झाला. त्यामुळे काही वेळासाठी कारवाई थांबली होती. शेवटी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेवून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. त्यानंतर अतिक्रमणाची कारवाई सुरळीत झाली.

रस्त्यावरील भंगार बाजाराचे अतिक्रमण हटविले

अंजिठा चौफुली जवळील भंगार बाजार, क्रबस्तान दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण वाढलेले होते. या अतिक्रमण कारवाई दरम्यान लोकप्रतिनीधी इबा पटेल यांनी यावेळी अतिक्रमण कारवाईसाठी मदत करत नागरिकांना समजवीत अतिक्रमण काढण्यासाठी सहकार्य केले.

रस्त्यालगत असलेला भंगार बाजाराची जागा ही महापालिका प्रशासनाच्या मालकीची असून, या जागेचा करार संपलेला आहे. मात्र, अद्यापही महापालिका प्रशासनाकडून ही जागा ताब्यात घेण्याची कारवाई केलेली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या