Wednesday, April 24, 2024
Homeधुळेमहापालिकेच्या सफाई कामगाराला मारहाण

महापालिकेच्या सफाई कामगाराला मारहाण

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

महापालिकेचे सफाई कामगार मोहसीन मुनाफ मेहतर यांच्यावर सफाई काम करतांना प्रभाग 12 मधील जनता सोसायटीत एका व्यक्तीने हल्ला केला व त्यांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. अशी तक्रार अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसने महापालिका प्रशासनाकडे दिली आहे.

- Advertisement -

याबाबत महापालिका प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि. 17 नोव्हेंबर रोजी मोहसीन मेहतर हे सफाई कामगार शहरातील प्रभाग क्र. 12 मधील जनता सोसायटी येथे गटार सफाई करीत असतांना तेथील स्थानिक व्यक्तीने त्यांना मारहाण केली व त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

त्यामुळे मोहसीन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हल्ला करणारे व्यक्तीवर त्वरीत कारवाई करण्यात यावी. अन्यथा महापालिकेतील सर्व सफाई कामगार काम बंद आंदोलन करतील.

सफाई कामगारांवर हल्ला होतो परंतू पोलिस यंत्रणा त्याची दखल घेत नाही असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

निवेदनावर जिल्हाध्यक्ष लक्ष्मण चांगरे, अनिल माणिक, शशिकांत जाधव, महेंद्र ठाकरे यांच्यासह 21 जणांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या