Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; 'या' तारखेला होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ तारखेला होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई | Mumbai

मुंबई विद्यापीठात शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आली आहे. दिनांक ३० जानेवारीला होणाऱ्या तब्बल ३० परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या संदर्भातील अपडेट विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

राज्यात लवकरच महाराष्ट्र विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांचं मतदान ३० जानेवारी रोजी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा आता ७ फेब्रुवारी २०२३ रोजी होतील, असं विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे.

विधि (Law), अभियांत्रिकी (Engineering) विज्ञान शाखेचे (M.Sc) चौथे सत्र, वाणिज्य (Commerce) आणि अन्य संबंधित अभ्यासक्रमांचा समावेश होता. तर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठीच्या निवडणुकीमुळे मानवता विषयाच्या पदव्युत्तर पदवी सत्र तिसरे आणि चौथे, विधि अभ्यासक्रमाचे सत्र तिसरे, अभियांत्रिकी (Engineering : SE Sem III) अभ्यासक्रमाचे सत्र तिसरे, विज्ञान शाखेच्या एमएससी सत्र चौथे, एम एससी भाग दोन, वाणिज्य शाखेच्या, एमकॉम भाग दोन या परीक्षा ३० जानेवारी रोजी घेण्यात येणार होत्या.

दरम्यान, Maharashtra Public Service Commission (MPSC) माध्यामातून बंपर भरती होणार आहे. MPSC मेगा भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. ८ हजार १६९ जागांची भरती केली जाणार आहे. यासाठीची पूर्वपरिक्षा राज्यातल्या ३७ जिल्हा केंद्रावर होणार आहे. संयुक्त पूर्व परिक्षेच्या निकालावर मुख्य परिक्षेसाठी पात्र उमेदवारांची मुख्य परिक्षा होणार आहे.

ही पूर्वपरिक्षा ३० एप्रिल रोजी होणार आहे. यातही महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२३ ही २ सप्टेंबर रोजी तर गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२३ ही ९ सप्टेंबर रोजी होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या