Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई : 1 ऑक्टोबरपासून टोल दरवाढ

मुंबई : 1 ऑक्टोबरपासून टोल दरवाढ

मुंबई | Mumbai

मुंबईत 1 ऑक्टोबरपासून टोल दरवाढ लागू करण्यात आली आहे. छोट्या आणि जड वाहनांच्या टोलदरात वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार छोट्या गाड्यांसाठी 40 रुपये तर ट्रक, बसेससाठी 130 रुपये मोजावे लागणार आहे. मुंबईतील 5 प्रवेशद्वारांवर ही टोलवाढ लागू करण्यात आली आहे.

- Advertisement -

यामध्ये मुलुंड, वाशी, दहिसर, ऐरोली आणि लाल बहादूर शास्त्री मार्ग या पाच टोलनाक्यांचा समावेश आहे. नवे दर 30 सप्टेंबर 2023 पर्यंत लागू असतील. राज्ये रस्ते विकास महामंडळासोबतच्या करारानुसार दर तीन वर्षांनी टोलदरात वाढ होते. त्यानुसार कार आणि जीपसारख्या वाहनांना एकेरी प्रवासासाठी पाच रुपयांची वाढ होऊन टोल आता 40 रुपये होणार आहे. हलक्या वाहनांचा मासिक पासमध्येही 100 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे मासिक पास आता 1400 रुपयांवरुन 1500 रुपये होणार आहे. हलक्या वाहनांच्या मासिक पासमध्येही दरवाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार आता हलक्या वाहनांना मासिक पाससाठी 1500 रुपये मोजावे लागणार आहे. तर अवजड वाहनांसाठी 160 रुपये मोजावे लागतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या