Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रMumbai-Pune Expressway वर कार-कंटेनरचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, ४ जखमी

Mumbai-Pune Expressway वर कार-कंटेनरचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, ४ जखमी

मुंबई | Mumbai

पुणे – मुंबई एक्स्प्रेसवेवर अपघाताचे सत्र सुरूच आहे. मुंबई-पुणे महामार्गावर आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने स्विफ्ट डिझायर कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये कारचा अक्षरश: चक्काचूर झाला असून एका महिलेसह दोन जण जागीच ठार झाल्याची प्राथामिक माहिती आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवार सकाळी ९ च्या सुमारास एम एच ४६ ए आर ०१८१ हा कंटेनर पुण्याकडून मुंबईकडे जात होता. पुढे जाताना किलोमीटर ३५ जवळ आल्यावर हा कंटेनर मुंबईकडील लेन सोडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर येऊन पलटी झाला. या अपघातात पाच चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे. त्यात कारमधील १ महिला आणि चालकाचा जागेवरच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना एमजीएम रुग्णालय कामोठे येथील दाखल करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या