Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रदहशतवादी याकुबच्या कबरीवरील एलईडी काढल्या; मुंबई पोलिसांची कारवाई

दहशतवादी याकुबच्या कबरीवरील एलईडी काढल्या; मुंबई पोलिसांची कारवाई

मुंबई | Mumbai

1993 मुंबई बॉम्बस्फोटातील (1993 Mumbai Bomb Blast) दोषी याकूब मेमनच्या (Yakub Memon) कबरीची सजावट करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. कबरीभोवती मार्बल आणि एलईडी दिवे लावण्यात आले आहे…

- Advertisement -

कोविड काळात मुंबई बॉम्बस्फोटातील (Mumbai Bomb Blast) दोषी याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण करण्यात आले. हा प्रकार मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) लक्षात येताच पोलिसांनी कारवाई करत कबरीवरील एलईडी लाईट्स काढून टाकण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेचे पथकही लवकरच कबरीची पाहणी करणार असल्याची माहिती मिळत आहे.

राज्यात मुसळधार! ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, नाशिक, नगरची परिस्थिती काय?

दरम्यान, 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी याकूब मेमन याला फाशीची शिक्षा देण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या मृतदेहाला मुंबईतील बडा कब्रस्तान येथे दफन करण्यात आले होते. एका दहशतवाद्याच्या कबरीची अशा पद्धतीने सजावट केल्याचे समोर आल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

ढगफुटी सदृष्य पावसाचा हाहाकार; पिकांचे नुकसान

- Advertisment -

ताज्या बातम्या