Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याअखेर मुंबई उच्च न्यायालयाचा लटकेंना मोठा दिलासा

अखेर मुंबई उच्च न्यायालयाचा लटकेंना मोठा दिलासा

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील (Andheri East Assembly Constituency) पोटनिवडणुकीसाठी (By-Elections) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी देण्यात आली आहे…

- Advertisement -

लटके या मुंबई महापालिकेत कर्मचारी असल्याने त्यांना राजीनामा देणे बंधनकारक होते. त्यानुसार त्यांनी आपला राजीनामा मुंबई महापालिकेकडे (BMC) सादर केला. परंतु महापालिकेने तो स्वीकारलेला नसल्याने लटके यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली होती.

त्यानंतर आज झालेल्या सुनावणीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत लटकेंचा राजीनामा (Resignation) मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ऋतुजा लटके यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या