Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्या१०० पेक्षा अधिक काश्मीर पोलिसांची साथ! चर्चा मुंबई क्राईम ब्रँचच्या धडक कारवाईची...

१०० पेक्षा अधिक काश्मीर पोलिसांची साथ! चर्चा मुंबई क्राईम ब्रँचच्या धडक कारवाईची…

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

मुंबई क्राईम ब्रँचकडून (Mumbai Crime Branch) मोठी कारवाई करण्यात आली आहे. काश्मीर मध्ये धडाकेबाज कारवाई करत ड्रग्ज तस्कराच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. गुलजार मकबूल अहमद खान ( drug peddler Gulzar Maqbool Ahmed Khan) असे या संशयिताचे नाव आहे….

- Advertisement -

गेल्या काही महिन्यांपूर्वी 24 किलो ड्रग्जसह 4 जणांना मुंबईच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. या प्रकरणात गुलजार मकबूल अहमद खान (Guljar Makbool ahamad khan) याचे नाव समोर आले होते. तेव्हापासून मुंबई पोलीस (Mumbai Police) त्याच्या मागावर होते. गुलजारच्या अटकेसाठी 7 जणांचे एक पथक काश्मीरला गेले होते त्यांनीच ही कामगिरी केली.

या कारवाईत १०० पेक्षा अधिक काश्मिरच्या पोलिसांनी मुंबई पोलिसांना बॅकअप (Kashmiri police back up to Mumbai Police) देत साथ दिली. गुलजारला श्रीनगरमधील शेरगारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मगरमल बाग परिसरातून अटक करण्यात आली आहे. गुलजार हा कुठल्या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आहे का? याचा शोध मुंबई पोलीस घेत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या