Friday, April 26, 2024
Homeनगरमुळा डाव्या कालव्यातून आवर्तनाची मागणी

मुळा डाव्या कालव्यातून आवर्तनाची मागणी

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

उभी पिके जळून चालल्याने शेतीसाठी मुळा डाव्या कालव्यातून आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी

- Advertisement -

राहुरी तालुक्यातील पूर्वभागातील डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी संचालक किशोर वने व लाभधारक शेतकर्‍यांनी केली आहे.

मागील महिन्यात रोटेशन दि.5 मार्च ते दि.26 मार्च या कालावधीत 200 क्युसेकने सोडण्यात आले होते. त्यामुळे सुरुवातीला दि.5 मार्चला ज्या शेतकर्‍यांचे भरणे झाले त्या शेतकर्‍यांचे आतापर्यंत पूर्ण भरणे वाळून गेले आहे. त्यामध्ये अनेक दिवस उलटून गेल्याने कांदा, ऊस, घास, मका, गिन्नीगवत यासारखी चारा पिकेही जळून गेले आहेत.

तातडीने पाणी सोडण्याची मागणी माजी संचालक किशोर वने, संचालक उत्तमराव आढाव, रवींद्र म्हसे, रवींद्र आढाव, रवींद्र मोरे, सरपंच अब्बासभाई शेख, मुसळवाडीचे सरपंच अमृत धुमाळ, सुनील मोरे, दिलीप इंगळे, रमेश वने, दत्तात्रय खुळे, मधुकर पवार, ज्ञानदेव देठे, सुभाष वने, उत्तमराव खुळे, शिवशंकर कर्पे, पोपट झुगे, कैलास झुगे, किरण बोरावके, सतीश म्हसे, दिलीप म्हसे, सुरेश झुगे, पोपट जाधव, दत्तात्रय म्हसे, प्रमोद बोरावके, बापूसाहेब धसाळ, प्रमोद झुगे, बाबासाहेब शेळके, गोरख शेळके यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या