Saturday, April 27, 2024
Homeनगरसोनईत मुळा एज्युकेशनच्या जागेची केंद्रीय अधिकार्‍यांनी केली पाहणी

सोनईत मुळा एज्युकेशनच्या जागेची केंद्रीय अधिकार्‍यांनी केली पाहणी

सोनई |वार्ताहर| Sonai

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे कट्टर समर्थक आगळे यांनी दिल्ली येथे मंत्री शंकरराव गडाख यांच्या अधिपत्याखाली असलेल्या मुळा एज्युकेशन सोसायटीच्या जागेबाबत दुसर्‍यांदा तक्रार केल्यानंतर काल सोमवार दि. 20 जून रोजी दिल्ली येथील केंद्रीय अधिकार्‍यांनी मुळा एज्युकेशन सोसायटी परिसर व जागेची पाहणी केली.

- Advertisement -

आगळे यांनी जरी तक्रार केली असली तरी या मागे करते करविते माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हेच आहे व त्यांच्या पाठिंब्याशिवाय आगळे हे काहीच करू शकत नाही अशी सोनई परीसरातील ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. तातडीने जागा पाहण्याची कार्यवाही झाल्याने मुळा एज्युकेशन सोसायटी जमीनदोस्त होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी यांची अडचण होईल परंतु खरी अडचण होणार आहें.

मंत्री गडाख यांना अडचणीत आणण्यासाठी थेट दिल्ली येथून यंत्रणा हलली आहे. विरोधकांना सळो की पळो करून सोडणारे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही मुळा एज्युकेशन सोसायटीच्या विरोधात अर्ज दिला आहे. मुळा एज्युकेशनच्या आडून मंत्री गडाखांचा वाढता राजकीय प्रभाव संपवण्यासाठी विरोधकांनी निशाणा साधला आहे. यामुळे आता मंत्री गडाख व मुळा एज्युकेशन सोसायटीचे पुढे काय होणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मुळा एज्युकेशन सोसायटी मागचा चौकशीचा फेरा संपण्यास तयार नाही अशीच स्थिती सध्या आहे.

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी कट्टर समर्थकाला हाताशी धरून मुळा एज्युकेशन सोसायटी व मंत्री गडाख यांना दिल्लीच्या यंत्रणेमार्फत पुरते जेरीस आणले आहे. मुळा एज्युकेशन सोसा जमिनदोस्त होते की काय व पुढे मंत्री गडाख यांचे काय होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या