Thursday, April 25, 2024
Homeनगरमुळा लवकरच ओव्हरफ्लो

मुळा लवकरच ओव्हरफ्लो

कोतूळ |वार्ताहर| Kotul

अहमदनगर एमआयडीसी तसेच जिल्ह्याची जीवनदायिनी असलेले मुळा धरणाच्या पाणलोटातही पावसाचा जोर कायम असल्याने या धरणाकडे येणारी आवक पाहता हे धरणही दोन-तीन दिवसांत ओव्हरफ्लो होण्याची दाट शक्यता आहे.

- Advertisement -

मंगळवारी सकाळी मुळा नदीत केवळ 1873 क्युसेक विसर्ग होता. पाऊस वाढल्याने सायंकाळी तो 2984 क्युसेक झाला होता. पण त्यानंतर मुळा पाणलोटात पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने मुळा नदीतील कोतूळ येथील विसर्ग काल गुरूवारी 6951 क्युसेक होता. बुधवारी रात्री आणि गुरूवारी दिवसभर हरिश्चंद्र गड, पाचनई, आंबित व अन्य ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने तासागणिक मुळा नदीतील पाणी वाढ होते.

काल गुरूवारी सायंकाळी मुळा नदीतील कोतूळ येथील विसर्ग 12041 क्युसेक होता. यात रात्रीतून आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेल्या मुळा धरणाची क्षमता 26000 दलघफू आहे. काल सायंकाळी 21966 (84.48 टक्के) झाला होता. तर धरणाकडे आवकही चांगली होत आहे. जलाशय परिचलन सूचीनुसार पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी या धरणातूनही 90 टक्के पाणीसाठा झाल्यानंतर धरणातून खाली मुळा नदीत पाणी सोडण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या