शेवटच्या क्षणापर्यंत मी भाजपातच राहणार – खा.रक्षा खडसे

jalgaon-digital
1 Min Read

मुक्ताईनगर – Muktainagar :

मला पक्षाने संधी दिली त्यामुळे मी पक्षामुळे खासदार झाली असून मी कालही भाजपात होती आज ही भाजपात आहे आणि

भविष्यातही म्हणजेच शेवटच्या क्षणापर्यंत पक्षातच राहणार असे ठाम मत रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खा. रक्षाताई खडसे यांनी मुक्ताईनगर येथे व्यक्त केले.

मुक्ताईनगर येथील खासदार कार्यालयात मुक्ताईनगर विधानसभेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या काही निवडक भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.

सदर बैठक बंदिस्त वातावरणात पार पडली त्या ठिकाणी प्रसारमाध्यमांना मात्र आमंत्रित करण्यात आले नव्हते.

या बैठकीचे अध्यक्षस्थानी विजय पुरानिक हे होते.प्रसंगी खा. रक्षाताई खडसे, रवी अनासपुरे, किशोर काळकर,डॉ. अशोक कांडेलकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदू महाजन, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे, यावेळी खा. रक्षाताई खडसे यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना संबोधित करताना, मी भाजपाच्या तिकिटावर निवडून आली.

त्यामुळे मी भाजपात होती भाजपामध्ये आहे व भविष्यातही शेवटपर्यंत भाजपाच राहील असे असे ठामपणे सांगितले.

यावेळी विजय पुरानिक, डॉ. राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती या बैठकीत पक्ष बांधणीवर जास्त भर देण्याचे सांगण्यात आले.

भगतसिंग पाटील, अनिल खंडेलवाल,नगरसेवक ललित महाजन,नगरसेवक मुकेश वानखेडे, नगरसेवक ललित महाजन,नगरसेवक बबलू कोळी,अंकुश चौधरी, कैलास वंजारी यांच्यासह बोदवड व मुक्ताईनगर तालुक्यातील सुमारे 40 ते पन्नास जणांची उपस्थिती होती.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *