Saturday, April 27, 2024
Homeजळगावपंधरा वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

पंधरा वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

मुक्ताईनगर – Muktainagar – वार्ताहर :

तालुक्‍यातील रिगाव येथे आंघोळीसाठी गेलेल्या पंधरा वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी अडीच वाजता घडली.

- Advertisement -

दरम्यान याबाबत मुक्ताईनगर पोलिसात भाग पाच गुन्हा रजिस्टर नंबर 88 / 20 20 सीआरपीसी 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली .

फिर्यादीत म्हटले आहे की , मुक्ताईनगर तालुक्यातील रिगाव येथील सुमित संतोष मेहंगे वय 15 वर्षे हा मुलगा री गाव येथील तलावात आंघोळीसाठी गेला असता त्या पाण्यात पडून त्याचा मृत्यू झाला सदर घटना आज दुपारी दोन वाजून 35 मिनिटांनी घडली.

या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे तपास पोलिस नाईक संदीप खंडारे हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या